पुणे : आघाडीची म्युच्युअल फंड संस्था असलेल्या ट्रस्ट म्युच्युअल फंड ने मल्टिकॅप फंडची सुरुवात केली असून मोठ्या, मध्यम आणि स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये योजनेद्वारे प्राप्त झालेला पैसा गुंतवला जाणार आहे. ही एक ओपन एंडेड योजना असून १४ जुलै २०२५ पर्यंत या योजनेतील गुंतवणुकीसाठी अर्ज करता येणार आहे.
वैविध्यपूर्ण आणि शिस्तबध्द दृष्टीकोन ठेवत भांडवली बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांसाठी ट्रस्ट मल्टिकॅप फंड हे वरदान ठरणार आहे. दीर्घकालीन गुंतवणूक आणि संतुलित रिस्क—रिटर्न हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. योजनेतील २५ टक्के पैसा मोठ्या, मध्यम कंपन्यांसह स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये गुंतवला जाईल. तर ४० ते ६० टक्के पैसा सर्व क्षेत्रातील परतावा देण्याची क्षमता असणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवला जाणार आहे. गुंतवणुकीआधी मजबूत संशोधन केले जाईल. निफ्टी ५०० मल्टिकॅप निर्देशांकातील समभागांची निवड प्रामुख्याने केली जाणार आहे.
वेगाने वृद्धिंगत होत असलेल्या आणि सक्रिय कंपन्या तसेच अल्फा जनरेशन कंपन्या निवडून त्यात गुंतवणूक करण्यावर भर दिला जाणार असल्याचे ट्रस्ट म्युच्युअल फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बागला यांनी सांगितले. भांडवली बाजारात गुंतवणुकीवर परतावा प्राप्त करण्यासाठी संयम आणि शिस्त अत्यंत आवश्यक असते. हे धोरण लक्षात ठेवत आम्ही योजनांवर लक्ष केंद्रित करतो.