ट्रीडेन्सकडून पुण्यात नवीन वितरण केंद्राची स्थापना; जागतिक एआय नवोपक्रमाला नवी चालना

पुणे : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डेटा सायन्स सोल्यूशन्सच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी ट्रीडेन्सने आज पुण्यात आपल्या नव्या वितरण केंद्राचे उद्घाटन करत भारतात आपल्या विस्ताराच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा गाठल्याची घोषणा केली. हे केंद्र ट्रीडेन्सच्या भारतातील दुसऱ्या सर्वात मोठ्या वितरण केंद्राच्या रूपात विकसित करण्यात येत असून २०२६ पर्यंत येथे १,००० कर्मचाऱ्यांची भर होण्याचा कंपनीचा मानस आहे.

सध्या पुण्यात ट्रीडेन्सचे ४०० कर्मचारी कार्यरत असून येत्या वर्षभरात ६०० ते ८०० नव्या व्यावसायिकांची भर घालण्याचे नियोजन आहे. ही भर ट्रीडेन्सच्या २०२५ च्या महत्त्वाकांक्षी योजनेचा भाग असून, यामध्ये १,७०० कर्मचाऱ्यांची भर घालण्याचे लक्ष्य आहे. कंपनीने जनरेटिव्ह, अजेनेटिक एआय आणि प्रगत डेटा अभियांत्रिकी यासारख्या नव्या तंत्रज्ञानावर केंद्रित रोडमॅप तयार केला आहे.

ट्रीडेन्सने उद्योग-शैक्षणिक सहकार्याला चालना देण्यासाठी पुण्यातील शैक्षणिक संस्थांसोबत धोरणात्मक भागीदारी उभारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे भविष्यातील तंत्रज्ञान प्रतिभेची मजबूत पाइपलाइन तयार होणार आहे. तसेच, ट्रीडेन्स स्टुडिओद्वारे एआय ॲक्सेलेरेटर तयार करून कार्यक्षमतेत वाढ केली जात असून ग्राहकांसाठी अंमलबजावणी खर्च कमी करण्यात येत आहे.

या प्रसंगी ट्रीडेन्सचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मुंजय सिंह म्हणाले, “पुणे हे आमचे भारतातील दुसरे सर्वात मोठे वितरण केंद्र आहे. या ठिकाणी जागतिक दर्जाची प्रतिभा उपलब्ध असून नवोपक्रमाला चालना देणारे परिसंस्थान आहे. आमचे एआय आणि डेटा सायन्स उपाय याठिकाणी विकसित करून जागतिक स्तरावर परिणामकारक ठरणार आहेत.”

ट्रीडेन्सच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी रेखा नायर म्हणाल्या, “पुणे कार्यालय हे एआय क्षेत्रातील उत्कृष्ट प्रतिभा आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ ठरणार आहे. अजेनेटिक एआय आणि प्रगत मशीन लर्निंग या क्षेत्रात नवोपक्रम व करिअर विकासासाठी हे एक महत्त्वाचे केंद्र बनेल.”

सध्या ट्रीडेन्सची उपस्थिती बेंगळुरू, चेन्नई, गुरुग्राम, कोलकाता आणि पुणे अशा प्रमुख शहरांमध्ये आहे. वर्षाच्या सुरुवातीस कंपनीने फरदर ॲडव्हायझरी प्राप्त करून बीएफएसआय क्षेत्रातील क्षमता वाढवली असून, त्या माध्यमातून स्टार्ट-टू-एंड एआय-आधारित परिवर्तनासाठी धोरणात्मक भागीदारी मजबूत केली आहे.