आजचं राशीभविष्य : २ जुलै २०२५ : जाणून घेऊया, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असेल!

आज, २ जुलै २०२५ रोजी, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी सकाळी ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत आहे, त्यानंतर अष्टमी सुरू होईल. संध्याकाळी ५ वाजून ४७ मिनिटांपर्यंत वरियान योग जुळून येईल. सकाळी ११ वाजून ८ मिनिटांपर्यंत उत्तरा फाल्गुनी नक्षत्र जागृत असेल आणि त्यानंतर हस्त नक्षत्र सुरू होईल. राहू काळ दुपारी १२ ते १:३० पर्यंत असेल. चला तर मग जाणून घेऊया, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असेल!

मेष राशी (Aries) : आज तुम्ही सामाजिक कामांमध्ये मदत कराल आणि सार्वजनिक कार्यांमुळे तुमची प्रशंसा होईल. कौटुंबिक जीवनात तुम्हाला सुख आणि समाधान मिळेल. तुम्ही सर्वांशी सलोख्याने वागाल. वैचारिक चंचलता टाळण्याचा प्रयत्न करा.

वृषभ राशी (Taurus) : तुम्हाला उत्तम मानसिक आरोग्य लाभेल. कौटुंबिक सौख्य द्विगुणित होईल आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. कष्ट करायला मागे-पुढे पाहू नका. नातेवाईकांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील.

मिथुन राशी (Gemini) : वादाच्या मुद्यांपासून दूर राहा. बौद्धिक चर्चांमध्ये सहभागी होऊ नका. कामात काही अचानक बदल घडून येतील, त्यामुळे प्रत्येक वेळी सावधान राहणे आवश्यक आहे. मित्रांसाठी तुम्हाला खर्च करावा लागू शकतो.

कर्क राशी (Cancer) : आज तुमच्या स्वभावात उगाचच चिडचिड जाणवेल. प्रफुल्लता आणि स्फूर्ती यांचा काहीसा अभाव राहील. तुम्ही स्वतःच्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल आणि अनावश्यक खर्च केला जाईल. वरिष्ठांना नाराज होण्याची शक्यता आहे.

सिंह राशी (Leo) : कौटुंबिक बाबींमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे. भावंडांचे सहकार्य मिळेल, पण दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी लागेल. मन विचलित होणार नाही याची काळजी घ्या आणि तरुणांचे विचार जाणून घ्या.

कन्या राशी (Virgo) : कामात स्त्रियांची मदत मिळेल. स्त्री वर्गाच्या सहाय्याने चांगला आर्थिक लाभ होईल. गोड बोलण्याने तुमची निर्धारित कामे पूर्ण होतील. नाहक खर्च होण्याची शक्यता आहे.

तूळ राशी (Libra) : कामासंदर्भात आज सतर्क राहावे लागेल. सहकाऱ्यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. व्यावसायिक शत्रूंवर बारीक लक्ष ठेवावे लागेल. नातेवाईकांकडून फार अपेक्षा ठेवू नका. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.

वृश्चिक राशी (Scorpio) : बरेच दिवस अडून पडलेले प्रश्न सुटू लागतील. गुंतवणूक वाढवावी लागेल आणि व्यावसायिक प्रश्न मार्गी लागतील. नवीन धोरण समोर ठेवावे लागेल. संपर्कातून लाभ होण्याची शक्यता आहे.

धनू राशी (Sagittarius) : तुमच्या मानसिकतेत हळूहळू बदल घडताना दिसेल. चिकाटी अधिक वाढवावी लागेल. घरातील प्रश्न सामोपचाराने सोडवावेत. सरळ मार्गाचा अवलंब करा. समोर येणारे कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा.

मकर राशी (Capricorn) : परिश्रम घेणे सोडू नका. कामे जिद्दीने पार पाडा. उत्साह कोणत्याही कारणाने कमी पडू देऊ नका. जुन्या गोष्टी उगाळण्याऐवजी नवीन विचार अमलात आणा. समोरच्या उपयुक्त गोष्टींचा वापर करा.

कुंभ राशी (Aquarius) : रखडलेल्या कामांना गती येईल. अपेक्षित लाभाचे मार्ग खुले होतील. मनाची चलबिचलता कमी होईल. थोडा उत्साह वाढवावा लागेल. बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका.

मीन राशी (Pisces) : मानसिक स्थैर्य वाढवावे लागेल. कामाचे स्वरूप पक्के करावे लागेल. अति घाई उपयोगाची नाही. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. क्रोधाला आवर घाला.