✍️नितीन करडे
दौंड तालुक्यातील चौफुला येथील अंबिका कला केंद्रात गोळीबार झाली असल्याची घटना सोमवारी (ता.२१) रोजी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणात ४ जणांच्या विरोधात गुन्हा यवत पोलीस ठाण्यात करण्यात आलेला असल्याचे दौंड उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांनी सांगितले. तर यात तीन जणांची नावे समोर आली असुन एक जण अनोळखी असल्याचे सांगितले. या प्रकरणाबाबतीत अंबिका कलाकेंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब आंधळे यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यात चंद्रकांत मारणे, गणपत जगताप बाबासाहेब मांडेकर, व एक जण अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
अंबिका कला केंद्रात गोळीबार झाला आहे. पण यात कोणीही जखमी झाले नाही. यात चार आरोपी असल्याचे समोर आली आहेत. यात तीन आरोपींची नावे उघड झाली असून एक जण अनोळखी आहे. यात पोलीस पुढील तपास करीत आहे. -गणेश बिराजदार, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती