Pune Rave Party Case : पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी मोठी अपडेट

Pune Rave Party Case : पुण्यातील खराडी येथील नामांकित स्टेबर्ड अझुर सुट हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी मध्यरात्री धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह एकूण सात जणांना अटक करण्यात आली होती.

आज (मंगळवार) या सर्वांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने प्रांजल खेवलकरसह चार अन्य आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, तर दोन महिला आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

या प्रकरणातील पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीत ड्रग्जचा वापर कसा झाला, याचा शोध घेण्यासाठी अधिक माहिती गोळा केली जात आहे.