प्रांजल खेवलकर ड्रग्ज प्रकरण : पुणे पोलिसांच्या कारवाईवर संशयाची छाया, कोर्टातील संपूर्ण घडामोडींचा आढावा

पुणे, २९ जुलै २०२५  : प्रांजल खेवलकर व इतर ६ जणांवर ड्रग्स पार्टी प्रकरणात पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईवर अनेक संशय उपस्थित झाले आहेत. अलीकडे कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये समोर आलेल्या बाबींमुळे आणि एफआयआरमधील तपशीलांमुळे ही प्रकरण आणखीच गूढ बनत चालले आहे.

गणेशोत्सवासाठी खास रेल्वे व्यवस्था! २५० विशेष गाड्यांची घोषणा; आरक्षण सुरू

घटना आणि अटक

घटनेच्या रात्री ३.१५ वाजता, खराडी येथील एका अपार्टमेंटमध्ये पार्टी सुरु असताना, पुणे क्राईम ब्रांचने छापा टाकला. दरवाजा उघडणारा व्यक्ती होता – प्रांजल खेवलकर. सात जण (५ पुरुष व २ महिला) तिथे उपस्थित होते. पोलिसांनी सर्वांना अटक करून कोर्टात हजर केले. यातील ५ आरोपींना पोलीस कोठडी तर २ महिलांना न्यायालयीन कोठडी (MCR) देण्यात आली.

एफआयआरमधील विरोधाभास

एफआयआरमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की पोलिसांनी रेड टाकण्याआधीच संबंधित रूम खेवलकरच्या नावाने बुक असल्याची माहिती मिळवली होती. परंतु, कारवाईच्या वेळी पोलिसांनी माध्यमांना सांगितले की आरोपी कोण आहेत, हे त्यांना रेड नंतरच कळले. हेच पहिले मोठे विरोधाभास मानले जात आहे.

Maharashtra School Holidays August 2025 : महाराष्ट्रातील सर्वच शाळांना ऑगस्ट महिन्यातील १५, १६ आणि १७ तारखेला सुट्टी राहणार ! कारण काय ?

ईशा सिंगच्या पर्समध्ये ड्रग्स

रेडमध्ये ईशा सिंग या महिलेकडून कोकेन व गांजा सापडले. तिच्या लाल पर्समध्ये 2.87 ग्रॅम कोकेन असल्याचे नमूद करण्यात आले. तथापि, तिला पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी देण्यात आली, तर तिच्यासोबत असलेल्या इतर पाच जणांना पोलीस कोठडी मागण्यात आली. हे सुद्धा एक संशयास्पद बाब मानली जात आहे.

फरार आरोपी ‘राहुल’

एफआयआरमध्ये आणखी एका आरोपी राहुलचा उल्लेख आहे, जो घटनास्थळी होता व पोलिसांच्या येण्यापूर्वी फरार झाला. पोलिसांनी कोर्टात कबूल केले की तो अजून सापडलेला नाही. पोलिसांकडे त्याचा चेहरा, नाव आणि ओळख असूनही दोन दिवसात त्याचा तपास का लागला नाही? हा मोठा प्रश्न आहे.

कोर्टातले निरीक्षण

पुणे पोलिसांनी मागील रिमांड रिपोर्टसारखेच मुद्दे पुन्हा ठेवले. त्यावर कोर्टाने विचारले की दोन दिवसांत पोलिसांनी काय तपास केला? तपासात काही ठोस पुरावे समोर आले का? आरोपी तपासात सहकार्य करत नाहीत, हेच एकमेव कारण पुरेसं नाही, असं स्पष्ट केलं.

अजूनही अनुत्तरित प्रश्न

  • कोकेन कुठून आणलं गेलं?

  • ईशा सिंगने ते कुठून घेतलं? कोण पेडलर होता?

  • आरोपींनी हे ड्रग्ज सेवन केले का? याचे रिपोर्ट्स येणे बाकी आहेत.

  • राहुल कुठे आहे?

संपादकीय दृष्टिकोन

ही केस केवळ ड्रग्ज प्रकरण नसून, पोलीस यंत्रणेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. कोर्टात पोलीस योग्य तपास करतात का, की निवडक आरोपींवरच लक्ष केंद्रित करून इतरांना सोडून दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं आहे. विशेषतः, एफआयआर आणि पोलिसांच्या प्रेस स्टेटमेंटमधील विसंगतीवर अधिकाऱ्यांनी खुलासा द्यावा.

संपूर्ण चौकशी आणि तपासानंतरच खरे दोषी कोण, हे स्पष्ट होईल. परंतु सध्या तरी, पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवणं कठीण जातं आहे.