रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना! सप्टेंबरपासून काहींना रेशन मिळणार नाही — यादीत तुमचं नाव आहे का? त्वरित तपासा!

राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभ घेणाऱ्यांसाठी आता ‘ई-केवायसी’ (e-KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया 31 जुलै 2025 ही अंतिम मुदत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

ऐतिहासिक निर्णय : नवरा-बायकोचे गुप्त कॉल आता कायदेशीर पुरावा! घटस्फोटाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

वेळोवेळी संधी मिळूनही केवायसी अपूर्ण

शासनाने ई-केवायसीसाठी तीन वेळा मुदतवाढ दिली होती. तरीही शहापूर तालुक्यातील तब्बल 43 हजार शिधापत्रिका धारकांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे 31 जुलैच्या आत ई-केवायसी न करणाऱ्यांना सप्टेंबरपासून रेशनवर धान्य मिळणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पगारात होणार ‘इतकी’ वाढ

केवायसी कुठे व कशी करावी?

ई-केवायसी करण्यासाठी रेशनकार्डधारकांनी खालीलपैकी कोणतीही एक पद्धत वापरावी:

  • नजीकच्या सेवा केंद्रावर जाऊन, आधार क्रमांक आणि रेशन कार्ड तपशीलासह केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.

  • प्ले स्टोअरवरून ‘मेरा केवायसी’ हे अ‍ॅप डाऊनलोड करून घरी बसून सुद्धा ही प्रक्रिया करता येईल.

काय होणार केवायसी न केल्यास?

जर तुम्ही दिलेल्या मुदतीत ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर तुमच्या रेशन कार्डवरील धान्याचा लाभ सप्टेंबरपासून थांबवला जाईल.

त्यामुळे ज्यांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी त्वरित पुढाकार घेऊन ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासन आणि संबंधित विभागांनी केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी ! जुलैच्या हप्त्याची संभाव्य तारीख जाहीर