हॅलो…साताऱ्याहून उदयनराजे भोसले बोलतोय म्हणत आमिर खानची मोठी फसवणूक, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

By: Editor_Pratik

On: Thursday, July 17, 2025 5:11 PM

aamir-khan-bajrangi-bhaijaan_226.jpg
Google News
Follow Us

मुंबई: गेल्या काही महिन्यांत मोठ्या सेलिब्रिटींची वेगवेगळ्या पद्धतीनं फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान याची मोठी फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू होता,असा नुकताच हा प्रकार समोर आला. अली अमानत शेर असं या आरोपीचं नाव आहे.

गंभीर बाब म्हणजे हा आरोपी आमिरला फोन करून मी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले बोलतोय, असं सांगायचा आणि इतर लोकांना त्याच्याकडे भेटायला पाठवत होता.हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर अली अमानत शेर अ याच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तापस करत आहेत.

तर हा आरोपी आमिर खान याला आपण सातऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले असल्याचं सांगायचा. सुरुवातीला त्यानं आमिरचा फोन नंबर मिळवला. त्यानंतर उदयनराजे भोसले यांच्या नावाचा वापर करून त्यानं आमिरची फसवणूक केली.

‘मी सातरहून उदयनराजे भोसले भोसले बोलतोय, माझे काही लोक तुम्हाला भेटायला येतील, त्यांची मदत करा’ असं हा आरोपी फोनवर सांगायचा. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार समोर होता. मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यापासून हा सगळा प्रकार सुरू होता, असं समोर आलंय.

आमिरच्या मनात संशय आल्यानंतर त्यानं उदयनराजे भोसलेंचे निकटवर्तीय असलेले पंकज चव्हाण यांना संपर्क साधला. यानंतर पंकज चव्हाण यांनी या आरोपीसोबत फोनवर संवाद साधला आणि धक्कादायक तितकाच गंभीर प्रकार समोर आला. पंकज चव्हाण यांच्याशी बोलताना आरोपीनं आपण उदयनराजे भोसले असल्याचं भासवलं. यानंतर हा प्रकार समोर आलाय.

आमिरची फसणूक समोर आल्यानंतर तातडीनं पोलिसांची मदत घेण्यात आली. आरोपी अली अमानत शेख याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now