देशातील आघाडीचे SUV उत्पादक टाटा मोटर्सच्या लोकप्रिय हॅरियर डाँट ईव्हीचे बुकिंग ग्राहकांसाठी १ जुलैपासून सुरू झाले आहे. कंपनीच्या पुणे प्रकल्पातून उत्पादित करण्यात येणाऱ्या या गाडीचे अत्याधुनिक सुविधेच्या प्रॉडक्शन लाइनमधून धमाकेदार पदार्पण नुकतेच केले. त्यामुळे आता हॅरियर डाँट ईव्ही आता देशभरातील डीलर्सकडे पोहोचण्यास सज्ज झाली आहे.
हॅरियर गाडी दाखल झाल्यापासून ग्राहकांच्या ती पसंतीस उतरली आहे. त्यामुळे आता नवी हॅरियर डाँट ईव्हीसुद्धा लोकप्रिय होत आहे. क्वॉड व्हील ड्राइव्ह (QWD) आणि रियर व्हील ड्राइव्ह (RWD) या दोन ड्राइव्ह कॉन्फिगरेशनमध्ये ही गाडी उपलब्ध आहे.
त्याशिवाय हॅरियर डाँट ईव्हीमध्ये नैनिताल नॉक्टर्न, एम्पॉवर्ड ऑक्साइड, प्रिस्टिन व्हाइट आणि प्युअर ग्रे रंग आहेत. ईव्ही प्रकारातील हॅरियमध्ये कंपनीच्या स्टिल्थ एडिशनचाही समावेश केला आहे. या स्टिल्थ एडिशनमध्ये एक गडद मॅट ब्लॅक एक्स्टीरियर आणि संपूर्ण ब्लॅक इंटीरियर आहे. या आक्रमक रंगामुळे गाडी एक ठळक स्टेटमेंट करते.
दरम्यान, नव्या हॅरियर डाँट ईव्हीची बांधणी प्रगत अँक्टि डाँट ईव्ही प्लस आर्किटेक्चरवर करण्यात आली असून ती सर्वाधिक टॉर्क आणि भारतीय एसयूव्हीमध्ये आजवर न दिसलेले सगळ्यात जलद एक्सलरेशन देणाऱ्या दमदार क्यूडब्ल्यूडी ड्युअल मोटर सेट-अपद्वारा संचालित आहे.
कमांडिंग पॉवर आणि जगातली तसेच सेगमेन्ट मधली पहिली अशी अनेक फीचर्स कंपनीने या गाडीत उपलब्ध केल्या आहेत. या फीचर्समध्ये सॅमसंग निओ QLED द्वारा संचालित हर्मन डिस्प्ले, इमर्सिव्ह डॉल्बी अॅटमॉस अॅकॉस्टिक्स आणि क्रांतिकारी 540° सराऊंड व्ह्यू प्रणाली देण्यात आली आहे. या नव्या फिचर्समुळे चालकाला गाडी चालवताना संपूर्णपणे नियंत्रण मिळवता येते.