Shocking News : चप्पल घेण्यासाठी आई मोरीजवळ गेली अन्…; दहा महिन्याच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू

By: Editor_Pratik

On: Monday, June 9, 2025 1:01 PM

Shocking News
Google News
Follow Us

Shocking News : नाशिकच्या देवळाली गावाजवळच्या रोकडोबावाडीत राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील दहा महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाळाचा खेळता खेळता रात्रीच्या सुमारास अचानकपणे मोरीत पाण्याने भरून ठेवलेल्या बादलीत बुडून मृत्यू झाला. रोशन अजय तायडे असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रोकडोबावाडी येथे संतोष यशवंत तायडे हे त्यांच्या कुटुंबासह एका लहानशा पत्र्याच्या घरात वास्तव्यास आहेत. तायडे पितापुत्र हमाली करून उदरनिर्वाह चालवतात. बुधवारी रात्री ९ वाजता तायडे कुटुंबीय घरात होते. रोहन व रोशन हे दोघे भाऊ मोबाइल बघत होते. रोशन खेळताना मोरीत गेला आणि तिथे बादलीत असलेल्या पाण्यात डोकावताना आत पडला. ही बाब लक्षात येताच अजय व संतोष तायडे यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रोशनच्या पश्चात आजोबा, आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. या घटनेने संपूर्ण रोकडोबावाडी, देवळाली गाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रोशनची आई अनिता या स्वयंपाक करत असताना काही सामान घेण्यासाठी त्यांच्या सासऱ्यांकडून पैसे घेऊन घराबाहेर पडत होत्या. यावेळी त्या चप्पल घेण्यासाठी मोरीजवळ गेल्या असता रोशन हा त्यांना बादलीत पालथा पडलेला दिसला. ते दृष्य पाहून या मातेने जोराचा टाहो फोडला. त्यांच्या आवाजाने सारेच खडबडून उठले अन् त्यांनी धाव घेत बादलीतून बाळाला बाहेर काढत रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

सावंतवाडी १८ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या वडिलांचाही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. १८ वर्षीय क्रिश संभया हा तरुण ३ जून रोजी कारीवडे येथील धरणावर फोटो काढायला गेला होता. यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो नदीत पडला. त्यामुळे पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह सापडला. क्रिशच्या निधनाची बातमी त्याचे वडील सेव्हिओ संभया यांना मोठा धक्का बसला. क्रिशच्या जाण्याचे दुःख सहन झाल्याने बुधवारी सकाळी सेव्हिओ यांनाही हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026