सहन होत म्हणून बाबांना फोन करून सांगत होती; २२ वर्षीय विवाहितेने ओढणीने गळफास घेऊन संपवले जीवन : दोन मुली एकाच घरात, ५ वर्षांपूर्वी झाला विवाह

By: Editor_Pratik

On: Wednesday, June 4, 2025 3:44 AM

Google News
Follow Us

पोखरापूर, ता. मोहोळ (जि. सोलापूर) — माहेरून चारचाकी वाहनासाठी व इतर खर्चासाठी पैसे आण, या दबावाखाली मानसिक आणि शारीरिक छळ सहन करणाऱ्या एका २२ वर्षीय विवाहितेने ओढणीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही दुर्दैवी घटना ३ जून रोजी दुपारी १२.४५ वाजता चिंचोली काटी (एमआयडीसी) येथे घडली.

मृत महिलेचे नाव आशाराणी पवन भोसले असे असून, तिचा विवाह ५ नोव्हेंबर २०१९ रोजी पवन भोसले (रा. चिंचोली काटी) याच्यासोबत पारंपरिक हिंदू रितीरिवाजाने झाला होता. आशाराणीला तीन वर्षांची मुलगी आहे. विशेष म्हणजे तिची सख्खी मोठी बहीणही याच कुटुंबात नांदत आहे.

विवाहानंतर सुरुवातीची दोन वर्षे संसार सुरळीत होता. मात्र त्यानंतर पतीकडून वारंवार पैसे मागणी, मारहाण व शिवीगाळ सुरू झाली. “चारचाकी घेण्यासाठी माहेरून पैसे आण” अशी मागणी होत होती. तसेच, “तुला स्वयंपाक येत नाही, तू नवऱ्याचा आदर करत नाहीस” अशा कारणांवरून सासू-सासऱ्यांकडूनही तिचा मानसिक छळ केला जात होता.

तिचे वडील नागराज डोणे (रा. रायचूर, कर्नाटक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती पवन भोसले, सासू अलका भोसले व सासरे बलभीम भोसले यांच्यावर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छळाला कंटाळून आशाराणी आपल्या वडिलांना अनेक वेळा फोनवर आपली व्यथा सांगत होती. मात्र दुसऱ्या मुलीचा संसार मोडू नये म्हणून वडिलांनी पैसे जमवून जावयाला ऑनलाईन पाठवले होते. तरीही छळ थांबला नाही. ऑक्टोबर २०२४ मध्ये तिला मारहाण करून घरातून हाकलण्यात आले. त्या वेळी ती मुलीसह माहेरी परतली होती. नंतर सोलापूर महिला तक्रार निवारण केंद्राच्या माध्यमातून तिला पुन्हा सासरी पाठवण्यात आले. परंतु, त्रास सुरूच राहिला.

अखेर मानसिक आणि भावनिक त्रास सहन न झाल्याने ३ जून रोजी आशाराणीने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026