पुढील ३ तासांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

By: Editor_Pratik

On: Friday, June 6, 2025 2:08 PM

Google News
Follow Us

पुणे : पुणे जिल्ह्यामध्ये पुढील तीन तासांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचबरोबर ४०-५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. पुणे वेधशाळेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांनी या काळात घराबाहेर पडणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. झाडे किंवा जुन्या इमारतींखाली उभे राहणे टाळावे. विजेच्या उपकरणांचा वापर करताना योग्य ती खबरदारी घ्यावी.

स्थानिक प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी केली असून, नागरिकांना कोणत्याही मदतीसाठी नजीकच्या आपत्कालीन सेवांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026