Pune : नणंदेकडून त्रास, ३१ वर्षीय महिलेनं चिमुकल्यासह इमारतीवरून मारली उडी; चिठ्ठीत लिहिलं कारण

By: Editor_Pratik

On: Thursday, June 19, 2025 4:14 AM

Google News
Follow Us

Pune : पुण्यात ३१ वर्षीय महिलेनं ६ वर्षांच्या चिमुकल्यासह इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडलीय. बुधवारी सायंकाळी आंबेगाव बुद्रुक परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आंबेगाव कल्पक सोसायटीत महिला राहत होती. नणंदेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मयुरी देशमुख असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे.

आत्महत्येआधी मयुरी देशमुख हिने एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यात नणंदेच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवत असल्याचा उल्लेख केला आहे. या घटनेची नोंद आंबेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिक तपास करत आहेत.

मयुरी देशमुख ही मूळची बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथली आहे. कुटुंबियांसह ती खामगावला गेली होती. पण मंगळवारी रात्री ती एकटीच पुण्याला निघून आली. पुण्यात पोहोचल्यानंतर तिने मुलगा विष्णू याच्यासह इमारतीच्या टेरेसवरून उडी मारली.

महिलेनं चिमुकल्यासह आत्महत्या केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इमारतीच्या छतावर चिठ्ठीही आढळून आली. त्यात नणंदेच्या त्रासाला कंटाळून मी हा निर्णय घेत असल्याचं लिहिलं आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026