Pune Crime : मुलगी झाली म्हणून चक्क १५ दिवस उपाशीपोटी डांबून ठेवले, पुण्यात आणखीन एका विवाहितेवर अत्याचार

By: Editor_Pratik

On: Saturday, June 7, 2025 12:38 PM

Navi Mumbai Crime
Google News
Follow Us

बीड : मुलगी जन्माला (Pune Crime) आली म्हणून एका महिलेला चक्क 15 दिवस उपाशीपोटी डांबून तिचा छळ केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात राहणारी शिवानी चंदनदिवे या महिलेला मुलगी झाली म्हणून तिच्या सासरच्यांकडून अमानुष छळ सहन करावा लागला. अखेर हतबल आणि निराश होऊन तिने आपल्या तान्हुल्या बाळाला घेऊन बीड येथे आपल्या माहेरचा आसरा घेतला आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत शिवानीने आपल्या सासरच्यांविरुद्ध तक्रार केली आहे. याप्रकरणी सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड येथील शिवानीचा विवाह पुण्यातील पिंपळा सौदागर येथील आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या निहाल चंदनशिवे याच्यासोबत मोठ्या धूमधडाक्यात झाला. लग्नाचे काही वर्ष चांगले गेले. यादरम्यान शिवानी गर्भवती राहिली आणि तिने मुलीला जन्म दिला. मात्र मुलगी झाली म्हणून शिवानीच्या पतीसह सासू – सासरा आणि दिराने तीचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. शिवानीला एका खोलीत उपाशीपोटी डांबून ठेवण्यात आले. मात्र संधी मिळताचा शिवानीने बाळाला घेऊन सासर सोडले आणि बीड येथे आपल्या माहेरी आश्रयाला गेली.

या प्रकरणी बीड पोलिसांनी पती निहाल चंदनशिवे, सासू निर्मला, सासरे अरुण चांदशिवेसह दीरावर गुन्हा दाखल केला आहे. शिवानीसोबत घडलेल्या क्रूर अत्याचार प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी त्वरित कारवाई करण्याचा निर्धार घेतला आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असताना, आता मुलगी झाली म्हणून एका विवाहितेचा असा अमानुष छळ चक्रावून टाकणारा आहे. या घटनेने सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्याला आणखीन एक कलंक लागला आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026