Pune Crime Big News : प्रेग्नंट असताना शरीरसंबंधांसाठी त्रास, हुंड्याचा छळ, पुण्यात 29 वर्षीय उच्चशिक्षित विवाहितेने आयुष्य संपवलं

By: Editor_Pratik

On: Monday, June 23, 2025 3:03 AM

Google News
Follow Us

Pune Crime Big News : हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या सततच्या जाचाला कंटाळून उच्चशिक्षित विवाहित तरुणीने आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार पु्ण्यात समोर आला आहे. छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना शुक्रवारी रात्री हांडेवाडी रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी तिच्या सासू विरोधात काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजचे राशीभविष्य: २३ जून २०२५ – सोमवारी प्रदोष शिवरात्री, ‘या’ तीन राशींवर भोलेनाथांची विशेष कृपा! तुमच्यावर त्याचा काय परिणाम होईल?

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका महिलेने पुण्यातच हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या सततच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यामुळे खळबळ माजली आहे.दीपिका प्रमोद जाधव, वय 29 वर्ष, रा. हांडवाडी रस्ता, हडपसर, असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. तिची सासू द्वारका जाधव हिच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि क्रूर वागणूक देणे या भारतीय न्याय संहितेच्या कलमांच्या अनुसार काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपिकाच्या वडिलांनी तक्रार दिली आहे.

रांजणगाव-ओझर अष्टविनायक महामार्गावर दुर्दैवी अपघात; सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

दीपिका आणि प्रमोद यांचे लग्न 2017 मध्ये झाले होते. दीपिकाने कृषी पदवीचे शिक्षण घेतले असून, ती एका खासगी कंपनीत नोकरी करीत होती. तिचा पती एका सरकारी कार्यालयात लिपिक पदावर आहे. त्यांना एक मुलगा आहे.

पती, सासू व नणंदेने छळ केल्याची तक्रार विवाहितेने कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. तक्रारदार गर्भवती असतानाही पतीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्रास देऊन पोटावर लाथ मारल्याने गर्भपात झाल्याची तक्रार विवाहितेने केली आहे.

सासू व नणंदेकडून पुन्हा मोठे लग्न लावून देण्यासाठी त्रास दिला जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पती, सास व नणंदेविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026