Nilesh Chavan Vaishnavi Hagawane Death Case : मैत्रिणीला सोबत ठेवलं अन्…; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील निलेश चव्हाणच्या अटकेची Inside Story

By: Editor_Pratik

On: Sunday, June 1, 2025 4:34 AM

Google News
Follow Us

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील प्रमुख आरोपी निलेश चव्हाण अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. विशेष म्हणजे, निलेशच्या अटकेत त्याच्या मैत्रिणीच्या उपस्थितीचा मोठा वाटा असल्याची माहिती समोर आली आहे. (Nilesh Chavan Vaishnavi Hagawane Death Case:)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निलेश पुण्यातून फरार झाल्यानंतर त्याची मैत्रीण सतत त्याच्यासोबत होती. “फिरायला जाऊया” असे सांगून निलेशने तिला सोबत नेले व तिचा मोबाईल फोनही वापरला. पोलिसांचे लक्ष एका व्यक्तीच्या मोबाईलवर होते आणि त्याच्याशी निलेशने मैत्रिणीच्या क्रमांकावरून संपर्क साधला. यामुळे पोलिसांना त्या क्रमांकाचा माग काढता आला.

त्या वेळी निलेश आणि त्याची मैत्रीण दिल्लीमध्ये होते. काही दिवसांनी निलेश गोरखपूरला खासगी बसने रवाना झाला आणि त्याची मैत्रीण पुण्याला परतली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तिची चौकशी केली. मात्र तपासात तिचा गुन्ह्याशी थेट संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्याने तिला सोडण्यात आले. तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गोरखपूरमध्ये शोधमोहीम राबवत निलेशला अटक केली.

निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. बावधन पोलिसांनी कर्वेनगरमधील त्याच्या घराची दीड तास तपासणी केली असून, यामध्ये शशांक, लता व करिष्मा हगवणे यांचे तीन मोबाईल फोन आणि इतर काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जप्त करण्यात आले आहेत. तसेच निलेशची परवानाधारक बंदूक व पासपोर्टही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्याचे कॉल रेकॉर्ड तपासले जाणार आहेत.

निलेशचा पोलिसांना चकवा देण्याचा डाव

  • निलेशने पोलिसांची नजर चुकवण्यासाठी अनेक क्लृप्त्या केल्या होत्या:
  • ऑनलाईन व्यवहार केल्यास लोकेशन ट्रेस होईल, याची भीती वाटून त्याने लाखो रुपयांची रोकड सोबत नेली.
  • विविध मोबाईल आणि सिमकार्ड वापरले; काही मित्रांकडून घेतले, तर काही नेपाळमधून खरेदी केली.
  • प्रत्येक सिम वेगळ्या मोबाईलमध्ये वापरत होता.
  • ऑनलाइन कॉलिंग अ‍ॅप्सद्वारे संपर्क करत होता.
  • अटकपूर्व जामीनासाठी वकिलांशीही ऑनलाइन संवाद साधला.
  • अनेक ठिकाणी स्थानिकांचा फोन व वायफाय वापरून संवाद साधत होता.
  • सीसीटीव्ही टाळण्यासाठी सार्वजनिक ऐवजी खाजगी वाहने वापरत होता.

लग्नात ‘रुखवत’ प्रकरण

हगवणे कुटुंबाविरोधात आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. वैष्णवीच्या लग्नात सुमारे दीड लाख रुपयांचे ‘रुखवत’ देण्यात आल्याची माहिती तिचे वडील अनिल कस्पटेंनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांना दिली. कस्पटे यांनी सांगितले की, शशांक हगवणेची मामी – जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीनेच हे रुखवत तयार केले होते. लता हगवणे व करिष्मा हगवणे यांनी खास सुपेकरांकडून रुखवत बनवून घ्या, असा आग्रह धरला होता. या रुखवतातील 1 लाख रुपये चेकद्वारे व 50 हजार रुपये रोख स्वरूपात दिले गेले.

तपास अधिक खोलवर सुरु असून निलेश चव्हाणचे आर्थिक व्यवहार, मोबाईल वापर आणि संपर्कातील व्यक्तींची चौकशी केली जात आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026