LONIKALBHOR | लोणी काळभोर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी : लाखोंच्या तांब्याच्या तारांची चोरी उघडकीस, ३ आरोपी जेरबंद!

By: Editor_Pratik

On: Thursday, June 12, 2025 2:56 PM

Lonikalbhor news
Google News
Follow Us

लोणी काळभोर (सचिन सुंबे)

LONIKALBHOR : थेऊर परिसरातून जुन्या तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या तीन आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी अटक करत, लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अज्ञात चोरट्यांविरुद्ध दाखल झालेला गुन्हा अत्यंत कौशल्याने उघडकीस आणत, लोणी काळभोर पोलिसांनी आपली तत्परता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, थेऊर येथील रहिवासी समाधान हिराजी डोंगरे (वय अंदाजे, रा. थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) यांनी आपला टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो (एम. एच. १२ जे. एफ. ५८०५) दिनांक ६ जून २०२५ रोजी रात्री ११.०० वाजता थेऊर गावाच्या हद्दीतील जय मल्हार हॉटेलसमोरील रोडच्या बाजूला मोकळ्या जागेत लावला होता. या टेम्पोमध्ये जुन्या जळालेल्या तांब्याच्या तारांचे ५५ बंडल असलेली पोती ठेवलेली होती.

दिनांक ७ जून २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता समाधान डोंगरे आपल्या टेम्पोजवळ आले असता, त्यांना टेम्पोमधून तांब्याच्या तारांची ९ पोती चोरीला गेल्याचे दिसून आले. चोरी झालेल्या ९ पोत्यांमध्ये एकूण ४९५ किलो वजनाच्या आणि ३,०१,९५०/- रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा होत्या. या प्रकरणी त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा (गु. र. नं. २५०/२०२५ भा. न्या. संहिता कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे) दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलीस ठाणे स्तरावर दोन स्वतंत्र पथके तयार केली. या पथकांना आरोपींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, तपास पथकातील पोलीस शिपाई प्रदीप गाडे आणि पोलीस शिपाई राहुल कर्डीले यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत आरोपींविषयी खात्रीशीर माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे, लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदार यांच्या मदतीने सापळा रचून, दिनांक १० जून २०२५ रोजी आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे: १) सुरज शाम जाधव (वय १९ वर्षे, रा. चव्हाण वस्ती, थेऊर ता. हवेली, जि. पुणे), २) यश अजित सावंत (वय २१ वर्षे, रा. चव्हाणवस्ती, थेऊर ता. हवेली जि. पुणे), आणि ३) महेश बस्वराज पुजारी (वय २२ वर्षे, रा. सदर) अशी आहेत.

आरोपींनी चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिल्याने, लोणी काळभोर पोलिसांनी त्यांना दिनांक १० जून २०२५ रोजी रात्री ९.०५ वाजता अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या एकूण ४९५ किलो वजनाच्या आणि ३,०१,९५०/- रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या आहेत.

या उत्कृष्ट कामगिरीमुळे लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन, गुन्ह्यात निष्पन्न करत, चोरीस गेलेला संपूर्ण माल जप्त केला आहे. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप निरीक्षक अनिल जाधव, पो. हवा. जाधव, पो. हवा. सातपुते, पो. हवा. वणवे, पो. हवा. भोसले, पो. हवा. माने, पो. हवा. जगदाळे, पो. हवा. देवीकर, पो. हवा. बारगजे, पो. हवा. माने, पो. शि. गाडे, पो. शि. कर्डीले, पो. शि. सोनवणे, पो. शि. शिरगिरे, पो. शि. दडस, पो. शि. पाटील, पो. शि. कुदळे, पो. शि. विर, म.पो.शि. थोरात यांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026