Horoscope Today : चित्रा नक्षत्रात कोणाच्या नशिबी प्रेम तर कोणाची वाढेल डोकेदुखी; वाचा तुमचे ७ जून २०२५ चे भविष्य

Horoscope Today : ७ जून २०२५, शुक्रवार: ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आज सकाळी ७ वाजून १८ मिनिटांपर्यंत आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजून १७ मिनिटांपर्यंत वरियान योग राहील आणि त्यानंतर परिघ योग जुळून येईल. सकाळी ९ वाजून ४० मिनिटांपर्यंत चित्रा नक्षत्र असेल, त्यानंतर स्वाती नक्षत्र सुरू होईल. राहू काळ सकाळी ९ वाजता सुरू होऊन १०:३० वाजेपर्यंत असेल. आज चंपक द्वादशी तिथी असून, ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. आज चित्रा नक्षत्र तुमच्या नशिबात काय घेऊन आले आहे, ते जाणून घेऊया.

मेष दैनिक राशिभविष्य (Aries Daily Horoscope Today)

आज तुमच्या कामातील उत्साह महत्त्वाचा ठरेल. तांत्रिक कामात तुम्हाला प्रगती करता येईल. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घेणे आवश्यक आहे. परोपकाराचा मार्ग अवलंबाल. नातेवाईकांना सांभाळून घ्यावे लागेल.

वृषभ दैनिक राशिभविष्य (Taurus Daily Horoscope Today)

कौटुंबिक कामातून तुम्हाला लाभ होईल. जुनी कामे व्यवस्थित पार पडतील. घरगुती कामाची जबाबदारी वाढेल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील. कामात काही क्षुल्लक अडथळे येऊ शकतात, पण ते तुम्ही पार कराल.

मिथुन दैनिक राशिभविष्य (Gemini Daily Horoscope Today)

आज तुमची धावपळ वाढू शकते आणि दिवसभर तुम्ही कामात व्यस्त राहाल. मनातील निराशा दूर सारणे महत्त्वाचे आहे. सर्व गोष्टी मनासारख्या होतील असे नाही. इच्छा नसतानाही प्रवास करावा लागू शकतो.

कर्क दैनिक राशिभविष्य (Cancer Daily Horoscope Today)

आज तुम्हाला मानपमानाचे प्रसंग अनुभवावे लागू शकतात. काही गोष्टी दुर्लक्षित करता आल्या पाहिजेत. अति विचार करणे टाळावे. कामाच्या ठिकाणी ताण जाणवेल. नातेवाईकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करा.

सिंह दैनिक राशिभविष्य (Leo Daily Horoscope Today)

अडचणीतून मार्ग काढता येईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील आणि काही नवीन स्वप्ने आकार घेऊ लागतील. पत्नीचा गैरसमज दूर करावा लागेल. लहानांबरोबर मजा-मस्ती कराल.

कन्या दैनिक राशिभविष्य (Virgo Daily Horoscope Today)

चांगले कौटुंबिक सौख्य लाभेल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. गुरूजनांची भेट होईल. अधिकारी लोकांच्यात तुमचे वावरणे वाढेल. ऐषारामाच्या वस्तू खरेदी केल्या जातील.

तूळ दैनिक राशिभविष्य (Libra Daily Horoscope Today)

मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. उष्णतेचा त्रास जाणवेल. खाण्या-पिण्याच्या वेळा पाळाव्यात. जवळचा प्रवास टाळता आला तर पहावा. पैसा अनाठायी खर्च होऊ शकतो, त्यामुळे जपून खर्च करा.

वृश्चिक दैनिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope Today)

मित्रांशी मतभेद संभवतात. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. उत्साहावर पाणी पडू देऊ नका. पित्ताचा त्रास जाणवू शकतो. कौटुंबिक शांतता जपण्याचा प्रयत्न करा.

धनू दैनिक राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope Today)

आज तुम्ही काहीसे हट्टीपणे वागाल. अधिकाराचा योग्य वापर करता आला पाहिजे. नसते साहस अंगाशी येऊ शकते. दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी. स्वत:च्या मर्जीने दिवस घालवाल.

मकर दैनिक राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope Today)

नवीन गुंतवणूक खात्रीपूर्वक करावी. फसवणुकीपासून सावध राहावे. मनातील चुकीच्या विचारांना थारा देऊ नका. बोलताना शब्द जपून वापरावेत. रोकठोक बोलणे टाळावे लागेल.

कुंभ दैनिक राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope Today)

आज थोडाफार डोकेदुखीचा त्रास जाणवेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. कोणावरही चटकन विश्वास ठेवू नका. कारण नसताना रागराग करू नये. कोणत्याही प्रसंगी संयम सोडून चालणार नाही.

मीन दैनिक राशिभविष्य (Pisces Daily Horoscope Today)

कामाच्या ठिकाणी सावध राहावे. कामे स्वबळावर पूर्ण करावीत. नसत्या शंका उत्पन्न करू नका. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी.