बंड गार्डन, पुणे येथील नवीन सुजाता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने २४ व २५ मे २०२५ रोजी दोन दिवसांच्या रंगतदार कार्यक्रमांसह आपला सुवर्ण महोत्सव साजरा केला.
शनिवारी उत्सवाची सुरुवात भक्तीमय सुंदरकांड पठणाने झाली. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवलेल्या तरुण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विविध वयोगटातील सभासदांच्या सहभागाने सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने सोसायटीतील ऐक्य आणि उत्साही वातावरणाचा प्रत्यय दिला.
रविवारी कार्यक्रम सौ. पूर्णिमा शिंदे यांच्या सूत्रसंचालनाखाली पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात शिवेश आणि त्यांची कन्या स्वरा यांच्या सुस्वर गणेश वंदनेने झाली. नंतर दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि अजीत मोरे यांनी तयार केलेल्या ‘डाऊन मेमरी लेन’ या भावस्पर्शी लघुपटाने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
कार्यक्रमास नामवंत बांधकाम व्यावसायिक नाईकनवरे आणि चौधरी कुटुंबीय, श्री. व सौ. वागास्कर, श्री. लक्ष्मीनारायण आणि वास्तुविशारद रवी कदम यांची उपस्थिती लाभली. श्री. आनंद नाईकनवरे यांच्या हस्ते सोसायटीचा विशेष कॅटलॉग प्रकाशित करण्यात आला.
कार्यक्रमाचा समारोप प्रा. शशांक दिवेकर आणि त्यांच्या संगीतमय समूहाच्या सुरेल ऑर्केस्ट्राने झाला.
हुतोक्षी वेलिंकर आणि सोसायटीची मॅनेजिंग कमिटी यांच्या संकल्पनेतून आणि आयोजनातून पार पडलेल्या या सुवर्ण महोत्सवामुळे नवीन सुजाता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या गौरवशाली वाटचालीस नवयुगीन साज लाभला.