आपण सर्वजण गुगल क्रोमचा (Chrome) सर्वाधिकरित्या वापर करत असतो. अशातच गुगल क्रोम हा जगभरातील एक अतिशय लोकप्रिय ब्राउझर आहे. जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या वेबब्राउझर गुगल क्रोमचा वापर करतात. तर यामध्ये संगणकापासून तू मोबाईल वापरकर्त्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे.
जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची किंवा विषयाची माहिती शोधण्यासाठी गुगल क्रोमचा वापर करत असतो. असे अनेकजण आहेत जे त्यांच्या छोट्या कामांसाठीही गुगल क्रोमचा वापर करत असतात. पण आता गुगलने या स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी क्रोम सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, आणि ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही अनेकदा गुगलने क्रोम बंद केल्याचे घडले आहे. त्यातच गुगलच नाही तर व्हॉट्सॲप सपोर्ट देखील जुन्या स्मार्टफोनमध्ये बंद केले आहेत.
वर्षभराची लेक आणि पत्नीला ट्रेनमधून फेकलं, पण पुरावे मिटवताना घोडचूक.. हैवानाला कसं पकडलं ?
पण गुगल किंवा इतर कोणतीही कंपनी असे का करते आणि यावेळी गुगलच्या या निर्णयाचा कोणत्या वापरकर्त्यांवर परिणाम होईल? आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत, तसेच तुम्हाला सांगणार आहोत की जर तुम्हाला गुगल क्रोम वापरणे सुरू ठेवायचे असेल तर यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? चला तर मग जाणून घेऊयात…
अँड्रॉइड 8 (ओरिओ) आणि अँड्रॉइड 9 (पाई) वर चालणाऱ्या स्मार्टफोन्सना आता गुगल क्रोम सपोर्ट करणे बंद केला जात असल्याची माहिती गुगलने दिली आहे. कंपनीने या दोन्ही मॉडेल्सवर चालणाऱ्या फोन्ससाठी अंतिम Chrome Version 138 जारी केले आहे. पाच वर्षांपूर्वी या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये हा ब्राउझर काम करेल, परंतु कंपनी या स्मार्टफोन्सना फ्यूचर अपडेट्स आणि सुरक्षा पॅच देणार नाही.
PCMC Inclusion : हिंजवडीचा महापालिकेत समावेश होण्याच्या हालचाली, राज्य सरकारकडून हिरवा कंदील
जेव्हा कंपनी जुन्या फोनसाठी सपोर्ट थांबवते तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुमच्या वयक्तिक महितीला धोका आहे कारण तुम्हाला सुरक्षा पॅचसह अपडेट मिळत नाहीत. जुन्या फोनसाठी सपोर्ट बंद करण्यात आला आहे कारण कंपनी नवीनतम वर्जनसह फोन वापरणाऱ्या लोकांना चांगल्या सुविधा देण्यावर लक्ष केंद्रित करते.
आता प्रश्न असा आहे की, या मॉडेल्सना कोणत्या दिवसापासून सपोर्ट मिळणे बंद होईल? कंपनीच्या मते, 5 ऑगस्ट 2025 नंतर तुम्ही या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या स्मार्टफोनवर गुगल क्रोम वापरू शकणार नाही. जर तुम्हाला क्रोम 139 आणि सुरक्षा अपडेट हवे असतील तर यासाठी तुम्हाला अँड्रॉइड 10 किंवा त्यावरील मॉडेलवर चालणारा फोन खरेदी करावा लागेल.