Brahmos 2 : पाकिस्तान मूळापासून हादरणार, ब्रह्मोसपेक्षाही स्पीड, घातक मिसाइलच्या प्रोजेक्टवर काम सुरु, जाणून घ्या त्या बद्दल

By: Editor_Pratik

On: Tuesday, June 3, 2025 10:57 AM

Brahmos 2
Google News
Follow Us

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने पाकिस्तानला ब्रह्मोस मिसाइलच्या ताकदीची जाणीव करून दिली होती. आता भारत आणखी प्रगत आणि अत्यंत घातक मिसाइल तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, DRDO ने स्वदेशी स्क्रॅमजेट इंजिनच्या विकासात महत्त्वाची कामगिरी केली आहे. भारत सध्या पुढील पिढीच्या हायपरसोनिक क्रूज मिसाइल ‘ब्रह्मोस-2’ वर काम करत आहे, जी ब्रह्मोसपेक्षा अधिक वेगवान आणि घातक असणार आहे.

ही अत्याधुनिक मिसाइल जवळपास मॅक 8 (आवाजाच्या वेगाच्या आठपट) गतीने उड्डाण करू शकते आणि 1500 किलोमीटरपर्यंत लक्ष्य भेदू शकते. संरक्षण क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीनुसार, भारत आणि रशिया यांच्यात ब्रह्मोस-2 च्या संयुक्त विकासासाठी उच्चस्तरीय चर्चा पुन्हा सुरू होणार आहे.

ब्रह्मोस-2 एक हायपरसोनिक क्रूज मिसाइल आहे, जी मॅक 6 पेक्षा अधिक गतीने लक्ष्याकडे झेपावू शकते. हे रशियाच्या 3M22 झिरकॉन मिसाइलवर आधारित असून स्क्रॅमजेट इंजिनवर चालणारे आहे. अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले हे मिसाइल भारत-रशिया संयुक्त उपक्रम ब्रह्मोस एयरोस्पेसने सुमारे 10 वर्षांपूर्वी विकसित करायला सुरुवात केली होती. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात तांत्रिक अडचणी आणि खर्चामुळे प्रगती संथ होती. शिवाय रशिया सुरुवातीला हायपरसोनिक तंत्रज्ञान शेअर करण्यात अनिच्छुक होता.

2008 साली या प्रोजेक्टची अधिकृत घोषणा झाली होती. 2015 पर्यंत पहिली चाचणी अपेक्षित होती, पण विविध कारणांमुळे प्रकल्पात विलंब झाला. त्यावेळी रशिया MTCR (Missile Technology Control Regime) चा सदस्य असल्यामुळे, 300 किमीपेक्षा जास्त पल्ल्याच्या तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करता येत नव्हती. पण 2014 मध्ये भारत MTCR सदस्य बनल्यामुळे या अडचणी दूर झाल्या.

जगभरात हायपरसोनिक शस्त्रांबाबत वाढती मागणी आणि संरक्षण स्पर्धेमुळे ब्रह्मोस-2 प्रोजेक्टला नवसंजीवनी मिळाली आहे. भारत आणि रशिया यांच्यातील नव्याने सुरू होणारे सहकार्य दोन्ही देशांच्या सामरिक हितासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. ब्रह्मोस-2, ज्याला ब्रह्मोस मार्क-2 देखील म्हटलं जातं, हे भारताच्या क्षेपणास्त्र विकासात मोठं पाऊल आहे.

वैशिष्ट्ये

  • गती: मॅक 6 ते मॅक 8 (आवाजाच्या वेगाच्या 6-8 पट)
  • मारक क्षमता: 1500 किमी
  • इंजिन: स्क्रॅमजेट (सध्याच्या ब्रह्मोसच्या रामजेटपेक्षा प्रगत)
  • वजन: सुमारे 1.33 टन
  • डिझाइन प्रेरणा: रशियन 3M22 झिरकॉन (मॅक 9 गती)
  • उपयोग: हे मिसाइल भारतीय एलसीए तेजसमध्ये सुद्धा बसवता येईल
  • ब्रह्मोस-2 हे भारताच्या संरक्षण क्षमतेत क्रांतिकारी बदल घडवणारे शस्त्र ठरेल. भविष्यातील युद्धशक्तीच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण झेप असेल.
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026