BIG NEWS PUNE METRO : मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी

By: Editor_Pratik

On: Thursday, June 26, 2025 7:25 AM

Google News
Follow Us

BIG NEWS PUNE METRO : मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी

मेट्रोचे जाळे विणले जात असताना पुणेकरांसाठी महत्वाची बातमी येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पुण्यातील मेट्रो लाईन २ च्या विस्तारासाठी 3,626 कोटींच्या निधीची मंजुरी दिली आहे. येत्या चार वर्षांत हा विस्तारित मार्ग पूर्ण करण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे मेट्रो २ च्या दुसऱ्या टप्प्याचे विस्तारीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. यामध्ये वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी या मार्गावर मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे. पुण्यातील हा मार्ग सर्वात पहिल्यांदा सुरु करण्यात आला होता. परंतू, तो रामवाडी ते वनाझपर्यंतच होता. तो आता कोथरुडच्या दिशेने चांदणी चौक आणि रामवाडीच्या दिशेने विठ्ठलवाडीपर्यंत वाढविला जाणार आहे.

BIG NEWS PUNE METRO : मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी

या दोन्ही बाजुचा विस्तार हा एकूण १२.७५ किमी लांबीचा असणार आहे. या अंतरात १३ स्थानके असतील, जी चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांना जोडतील.

या मेट्रो मार्गांचा फायदा आयटी प्रोफेशनल्ससोबतच मुंबई आणि बेंगळुरू सारख्या शहरांमधून येणाऱ्या बस प्रवाशांसाठी तसेच अहिल्या नगर आणि छत्रपती संभाजी नगर येथून येणाऱ्या बस प्रवाशांसाठी फायद्याच्या ठरणार आहेत.

पुण्यात अद्याप लाईन १, लाईन ३ चे काम सुरु आहे. पैकी लाईन १ वरील काही स्थानकांचे म्हणजेच खडकी, रेंजहिल या ठिकाणचे काम सुरु आहे. तर शिवाजीनगरपासून हिंजवडीपर्यंत जाणाऱ्या मेट्रोचे काम बरेचसे बाकी आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026