BIG NEWS : मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता

By: Editor_Pratik

On: Monday, June 9, 2025 10:35 AM

Google News
Follow Us

BIG NEWS : केरळच्या किनाऱ्याजवळ एका कंटेनर शीपचा मोठा अपघात झाला आहे. समुद्रात कंटेनर वाहतूक करणाऱ्या सिंगापूरचा ध्वज असलेल्या ‘MV WAN HAI 503’ या कंटेनर जहाजात स्फोट झाला. हा स्फोट कोचीपासून सुमारे ३१५ किमी पश्चिमेला समुद्रात असलेल्या जहाजाच्या अंडर डेकमध्ये झाला. या स्फोटात चार क्रू मेंबर्स बेपत्ता झाले असून, पाच जण जखमी झाले आहेत. जहाजावर एकूण २२ क्रू मेंबर्स होते आणि हे जहाज कंटेनर्सनी भरलेले होते.

Sonam Killed Raja Raghuvanshi : सोनम सापडली.. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

स्फोटानंतर बचाव कार्याला वेग देण्यात आला आहे. घटनास्थळी भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाने तात्काळ मदतीसाठी रवाना झाले. या स्फोटामुळे ५० कंटेनर समुद्रात पडले असल्याचे सांगण्यात आले असून, जहाजावर एकूण ६०० पेक्षा जास्त कंटेनर होते. नौदलाने आपल्या जहाजांसोबत तटरक्षक दलाची तीन जहाजे घटनास्थळी पाठवली आहेत.

स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु कंटेनरच्या आतूनच स्फोट झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय नौदलाचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, “कोझिकोडच्या बेपोर किनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजात स्फोट झाला आहे. हे जहाज सिंगापूरचे ध्वज असलेले कंटेनर जहाज आहे, ज्याची लांबी २७० मीटर आणि ड्राफ्ट १२.५ मीटर आहे. हे जहाज ७ जून रोजी कोलंबोहून मुंबईसाठी निघाले होते.”

पत्रकार कुटुंबांना वैद्यकीय खर्चात ५०% सवलत: ऐतिहासिक निर्णय!

बेपत्ता क्रू मेंबर्सचा शोध सुरू असून, जखमींना तात्काळ प्रथमोपचार दिले जात आहेत. तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान आणि जहाजे घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. तसेच, घटनास्थळी सर्व मदत पुरवली जात आहे. तटरक्षक दलाने घटनावर लक्ष ठेवून बचाव कार्य सुरू केले आहे. याशिवाय, जहाजावरील उर्वरित क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे म्हटले जात आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026