BIG NEWS | ECI News | सहा वर्षांपासून निवडणुकांपासून दूर असलेल्या ३४५ पक्षांची नोंदणी रद्द होणार! आयोगाची कारवाई सुरू

By: Editor_Pratik

On: Friday, June 27, 2025 2:23 AM

Google News
Follow Us

BIG NEWS | ECI News | सहा वर्षांपासून निवडणुकांपासून दूर असलेल्या ३४५ पक्षांची नोंदणी रद्द होणार! आयोगाची कारवाई सुरू

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने राजकीय स्वच्छता आणि पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. २०१९ पासून कोणत्याही निवडणुकीत सहभागी न झालेल्या आणि प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या ३४५ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची (Registered Unrecognized Political Parties – RUPPs) नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

BIG NEWS PUNE METRO : मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. या कारवाईचा उद्देश राजकीय व्यवस्थेचे शुद्धीकरण करणे हा आहे.

विहिरीच्या काठावर ओढणी; संशय आल्याने ४५ फूट खोल अंडरवॉटर कॅमेरा सोडला अन् पायाखालची जमीन सरकली

देशभरात सध्या २८०० पेक्षा अधिक RUPPs नोंदणीकृत आहेत. मात्र, त्यापैकी अनेक पक्षांनी नोंदणीसाठी आवश्यक अटी पूर्ण केलेल्या नाहीत आणि अनेक पक्ष निवडणुकीत अजिबात सक्रिय नाहीत. यामुळे निवडणूक आयोगाने मोठ्या स्तरावर पडताळणी मोहीम राबवून ३४५ पक्षांची प्रथम टप्प्यात निवड केली आहे.

ब्रेकिंग ! वीज ग्राहकांना मोठा दिलासा, राज्यभर वीजदर कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय

या निर्णयात पारदर्शकता राखण्यासाठी संबंधित पक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश संबंधित राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (CEOs) देण्यात आले आहेत. या पक्षांना त्यांची बाजू मांडण्यासाठी सुनावणीची संधी देण्यात येईल. त्यानंतर अंतिम निर्णय आयोग घेणार आहे.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम २९अ अंतर्गत नोंदणीकृत पक्षांना करसवलतीसह अनेक सवलती दिल्या जातात. मात्र, जे पक्ष वर्षानुवर्षे निष्क्रिय आहेत आणि निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेत नाहीत, त्यांच्यावर कारवाई आवश्यक असल्याचे आयोगाचे स्पष्ट मत आहे.

ECI च्या या निर्णायक टप्प्याने राजकारणात पारदर्शकता आणि जबाबदारीची नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारची कारवाई पुढेही टप्प्याटप्प्याने सुरू राहणार आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026