मोठी बातमी ! अजितदादांचा शरद पवारांना मोठा धक्का, बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश, तारीखही ठरली

By: Editor_Pratik

On: Sunday, June 1, 2025 12:04 PM

SHARAD PAWAR AJIT PAWAR
Google News
Follow Us

राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाथरी येथे आज बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय जाहीर करत ८ जून रोजी अजित पवार यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे पक्षप्रवेश करण्याची घोषणा केली. ते आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.

ही घडामोड त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरते की, सध्या दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र अशा चर्चांच्या काळातच शरद पवार गटातील एक माजी आमदार अजित पवार गटात दाखल होणे, हे शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वपूर्ण ठरू शकते.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी “मला काही माहिती नाही” असे म्हणत चर्चांना फारसे महत्त्व दिले नाही. तर आमदार रोहित पवार यांनी देखील या चर्चा असल्याचे सांगत, “वरिष्ठांकडून आम्हाला अद्याप काही सांगण्यात आलेले नाही, जर काही ठरले तर आम्ही कळवू,” असे स्पष्ट केले.

दरम्यान, बाबाजानी दुर्राणी यांच्या या निर्णयामुळे आगामी राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026