Khadakwasla Dam : मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; खडकवासला धरणाचा विसर्ग ४३४५ क्यूसेकपर्यंत वाढणार

By: Editor_Pratik

On: Thursday, June 19, 2025 12:30 PM

Khadakwasla Dam
Google News
Follow Us

Khadakwasla Dam : खडकवासला धरण साखळी परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. आज दुपारी १ वाजता खडकवासला धरणातून १९२० क्यूसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून, संध्याकाळी ६ वाजेपासून हा विसर्ग ४३४५ क्यूसेक्सपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

धरण परिसरातील वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष, पुणे आणि खडकवासला पाटबंधारे विभाग यांच्यावतीने संयुक्त अधीक्षक श्वेता कुऱ्हाडे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुठा नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, कारण पुढील काही तासांत विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Veshi Yoga 2025 : आज वेशी योगाचा दुर्लभ संयोग, मेष, कर्क आणि तूळ राशीसह ‘या’ राशींना मिळणार आर्थिक लाभ, जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य

प्रशासनाच्या वतीने महत्त्वाच्या सूचना :

  • मुठा नदीच्या पात्रात नागरिकांनी जाऊ नये.

  • नदीकाठी कपडे धुणे, जनावरे घालणे, पोहणे किंवा अन्य कोणतीही कृती टाळावी.

  • लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि जनावरे नदीपासून दूर ठेवावीत.

  • पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहेत.

  • आपत्कालीन प्रसंगी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा.

धरण साखळीतील सध्याचा पाणीसाठा (१९ जून २०२५, सायं. ५ वाजेअखेर):

धरण साठा (TMC) टक्केवारी पर्जन्यमान (मिमी)
खडकवासला 1.66 83.95% 73
पानशेत 2.46 23.13% 116
वरसगाव 4.16 32.45% 113
टेमघर 0.40 10.84% 90

एकूण साठा: 8.68 TMC (29.78%)

मागील वर्षी याच दिवशी: 3.62 TMC (12.43%)

एकूण पाण्याची आवक (Inflow): +1280 MCFT


सतर्कतेसाठी इशारा देण्यात आलेल्या प्रमुख यंत्रणा :

  • पुणे महानगरपालिका

  • पोलीस आयुक्त कार्यालय

  • पीएमआरडीए (PMRDA)

  • महावितरण कार्यालय (MSEB)

  • जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय

नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026