Ajit Pawar : राष्ट्रवादीला मोठा झटका, ७ आमदारांनी सोडली अजितदादांची साथ; या पक्षाची धरली कास

By: Editor_Pratik

On: Sunday, June 1, 2025 4:36 AM

Ajit-Pawar-Nagaland-MLA-Left-party-NCP
Google News
Follow Us

कोहिमा (नागालँड) : Ajit Pawar नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचे सात आमदार थेट मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) मध्ये विलीन झाले आहेत. यामुळे विरोधी पक्ष म्हणून NCP चे अस्तित्व मोठ्या प्रमाणात कमी झाले असून, सत्ताधारी पक्ष आणखी बळकट झाला आहे.

या सात आमदारांनी सोमवारी संध्याकाळी विधानसभा अध्यक्षांकडे अधिकृत विलिनीकरणाचे पत्र सादर केले. अध्यक्षांनी त्वरित यास मंजुरी दिली आणि या विलिनीकरणाला दहाव्या अनुसूची अंतर्गत वैधतेची मोहोरदेखील दिली आहे. या आमदारांमध्ये नामरी नचांग, के. ए. पोंगशी फोम, पिक्टो शोहे, वाई म्होनबेमो हम्त्सो, वाई मनखाओ कोन्याक आणि के. एस. तोइहो येप्थो यांचा समावेश आहे.

या घडामोडीमुळे NDPP चे विधिमंडळातील संख्याबळ 25 वरून थेट 32 वर पोहोचले आहे. 60 सदस्यीय विधानसभा असलेल्या नागालँडमध्ये हे सरकार आता अधिक मजबूत स्थितीत आले आहे. NDPP चे प्रवक्ते केन्ये यांनी सांगितले की, या विलिनीकरणामुळे सरकारची स्थिरता अधिक घट्ट झाली असून, कोणत्याही प्रकारचा धोका आता उरलेला नाही.

2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आश्चर्यजनक कामगिरी करत 12 जागांवर विजय मिळवला होता, ज्यामुळे ती NDPP आणि भाजपानंतर राज्यातील तिसरी सर्वात मोठी पक्ष ठरली होती. महाराष्ट्राबाहेर NCP चे हे यश लक्षणीय मानले जात होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर नागालँडमधील आमदारांनी अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा दिला होता. मात्र आता हेच आमदार थेट सत्ताधारी पक्षात विलीन झाल्याने, अजित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026