वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेवर आघात करणारा इंद्रायणी तीरावरील कत्तलखाना रहित करा !

By: Editor _2

On: Wednesday, June 4, 2025 3:12 PM

Google News
Follow Us

वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेवर आघात करणारा इंद्रायणी तीरावरील कत्तलखाना रहित करा !

ळंदी नगरपरिषद, तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे मागणी !

पुणे – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सुधारित विकास आराखड्यात श्रीक्षेत्र आळंदी येथे मोशी-डुडुळगाव सीमेवर, इंद्रायणी नदीच्या तीरावर अनुमाने 4 एकर क्षेत्रावर पशूवधगृह उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव केवळ कोट्यवधी वारकर्‍यांच्या श्रद्धेवर आघात करत नाही, तर संतपरंपरेचा अपमान आणि इंद्रायणी नदीच्या पावित्र्यावर कलंक ठरणार आहे. त्यामुळे शासनाने हा प्रस्ताव तात्काळ आणि कायमस्वरूपी रहित करावा, अशा मागणीचे निवेदन 3 जून या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मराठी भाषा तथा उद्योगमंत्री श्री. उदय सामंत, शिवसेना आळंदी शहरप्रमुख श्री. राहुल चव्हाण, आळंदी नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी अर्चना भिसे यांना देण्यात आले.

विविध ठिकाणी निवेदन देताना हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील आणि श्री. महेश पाठक, रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर उपस्थित होत्या.

हिंदु जनजागृती समितीकडून वारकरी संप्रदायातील प्रमुखांच्या भेटी !

वारकरी संप्रदायातील मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांनाही याविषयी माहिती देण्यात आली. त्या वेळी सर्वांनीच याविषयी खंत व्यक्त करून ‘कोणत्याही परिस्थितीत असे होऊ देणार नाही’ यासाठी संपूर्ण वारकरी संप्रदाय प्रयत्न करेल’, असे सांगितले. यात प्रामुख्याने देवीदास धर्मशाळेचे ह.भ.प. नीरंजन शास्त्री कोठेकर, संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर, ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, ह.भ.प. श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर, ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप आदींची भेट घेण्यात आली.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026