Sharmistha Panoli : पुण्यातल्या तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल, कोलकाता पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नेमकं प्रकरण काय?

By: Editor_Pratik

On: Saturday, May 31, 2025 1:01 PM

sharmishtha-panoli-instagram--76
Google News
Follow Us

Sharmistha Panoli :सध्या पुण्यात वकिलीचे शिक्षण घेणारी शर्मिष्ठा पनौली नावाची विद्यार्थिनी देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. तिने एका धर्माबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओनंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. आता याच शर्मिष्ठा पनौली हिला कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केलं आहे.

शर्मिष्ठा पनौली हिचा व्हिडीओ समोर आल्यानंतर तिच्यावर कोलकाता येथील गार्डनरीच पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर तिच्या अटकेचं वॉरंट जारी करण्यात आलं होतं. या सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर शर्मिष्ठा पनौली हिला कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक करण्यात आलं आहे. ती पुण्यात वकिलीचं शिक्षण घेत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार शर्मिष्ठा पनौली हिने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत तिने एका विशिष्ट धर्मावर बोलताना आक्षेपार्ह भाष्य केलं होतं. हा व्हिडीओ नंतर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर तिच्याविरोधात कोलकाता येथील गार्डनरीच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता कोलकाता पोलिसांनी या प्रकरणी तपास चालू केला आहे.

बाई, मोबाईल अन्… देशद्रोही रवी वर्माच्या काळ्याधंद्यांनी सर्वच चक्रावले; चौकशीत मोठी माहिती समोर?

पोलिसांच्या म्हणण्यानुसार शर्मिष्ठा पनौली हिने व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर ती तसेच तिचे कुटुंबीय गायब झाले होते. त्यामुळे पोलीस प्रशासन त्यांना नोटीस देऊ शकले नाही. अशा स्थितीत पोलिसांनी न्यायालयाकडे तिच्या अटकेसाठी अर्ज केला होता. पोलिसांची याचीका स्वीकारून न्यायालयाने तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. न्यायालयाकडून आदेश मिळताच कोलकाता पोलिसांच्या एका टीमने शर्मिष्ठा पनौलीचे लोकेशन ट्रेस करून तिला हरियाणातील गुरुग्राम येथून शुक्रवारी रात्री उशिरा अटक केलं आहे.

शर्मिष्ठा पनौलीचा तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिने बिनशर्त माफी मागितली होती. तसेच तिने तो वादग्रस्त व्हिडीओदेखील डिलीट केला होता. तरीदेखील न्यायालयाने तिच्या अटकेचा आदेश दिला. सध्या ती कोलकाता पोलिसांच्या कोठडीत आहे. पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026