💥 ब्रेकिंग न्यूज | बनावट लग्न घोटाळा उघडकीस | लग्नाच्या नावाखाली लाखोंचा गंडा 💥
पुणे – शहरात लग्नाच्या नावाखाली हजारो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. लग्न जमत नाही म्हणून चिंतेत असलेल्या कुटुंबांचा गैरफायदा घेत, बनावट नवरी आणि तिच्या ‘कुटुंबीयांच्या’ सहाय्याने ही टोळी अर्जंट लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून ४ ते ५ लाख रुपये उकळत होती.
या टोळीमध्ये एक महिला नवरीच्या भूमिकेत असते, तर अन्य पाच ते सहा लोक तिचे बनावट आई-वडील, भाऊ व नातेवाईक म्हणून अभिनय करतात. ठरलेले लग्न थाटामाटात लावले जाते, मात्र लग्नानंतर काही दिवसांतच ‘नवरी’ घरातील दागिने, रोकड घेऊन गायब होते.
CORONA UPDATE : कोरोनाबाबत मोठी बातमी; मुंबईत 53 रुग्ण, 2 मृत्यू; आरोग्यमंत्र्यांचे सतर्कतेचे आदेश
अशीच एक घटना पुण्यात घडली असून, फसवणूक झालेल्या नवऱ्या मुलाच्या नातेवाईकांनी चतुराईने संशयास्पद हालचालींचा माग काढून या टोळीला रंगेहाथ पकडले. नंतर सर्व प्रकार उघडकीस आला.
पोलीस तपास सुरु
या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपींचा तपास सुरू आहे. यामध्ये आणखी किती लोक फसवले गेले आहेत याचा शोध घेण्यासाठी पोलीस सायबर क्राइम व गुन्हे शाखेच्या मदतीने तपास करत आहेत.
Pune Ring Road : पुण्याची वाहतूक कोंडी होणार इतिहासजमा? ‘रिंग रोड’चा प्रवास ठरणार ‘गेम चेंजर’!
पोलीसांचा इशारा
पोलिसांनी नागरिकांना अशा बनावट दलाल, लग्न संस्था व “अर्जंट लग्न” अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. विवाहपूर्व नीट चौकशी करणे, आधार/पॅन यांची पडताळणी, कुटुंबाशी प्रत्यक्ष भेट अशी खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
🛑 सतर्क रहा – फसवणुकीपासून वाचण्यासाठी पोलीस व कायदेशीर मार्गांचा अवलंब करा!