सोनालिकाची फेब्रुवारी २०२५ मध्ये एकूण १०,४९३ ट्रॅक्टर विक्रीसह भरधाव प्रगती

By: Editor_Pratik

On: Friday, March 7, 2025 1:29 PM

Sonalika सोनालिका
Google News
Follow Us

फेब्रुवारीतील आतापर्यंतची देशांतर्गत सर्वाधिक वार्षिक ट्रॅक्टर विक्रीची नोंद

भारतातील नंबर १ ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेल्या सोनालिका ट्रॅक्टरने फेब्रुवारी’२५ मध्ये १०,४९३ एकूण ट्रॅक्टर विक्रीची शानदार कामगिरी करून आर्थिक वर्ष’२५ च्या अंतिम टप्प्यात प्रवेश केला आहे. सर्वोत्तम उत्पादन आणि सेवा प्रदान करण्याच्या आपल्या बळकट मूलभूत मूल्यांच्या आधाराने कंपनीने १,१३,२७९ ट्रॅक्टर विक्रीसह आतापर्यंतच्या सर्वोच्च देशांतर्गत वार्षिक (इयर टू डेट) विक्रीचा टप्पा फेब्रुवारी’२५ मध्ये गाठला आहे. तसेच उद्योगाच्या वार्षिक कामगिरीलाही मागे टाकले आहे. खरोखरच अजिंक्य परिणाम आणि विपुल यश मिळविण्यासाठी शेतकऱ्यांकरिता नावीन्यपूर्णता आणि शक्ती सुनिश्चित करून सोनालिका भारताच्या विकास प्रवासात सक्रिय योगदान देत आहे.

शेतकऱ्यांच्या आकांक्षांचे यशात रूपांतर करण्यावर सोनालिकाचा विश्वास आहे. तसेच आपल्या शानदार प्रवासात सहभागी असलेल्या सर्व भागधारकांसाठी समावेशक वाढ करण्याचे तिचे ध्येय आहे. कंपनी सातत्याने शक्तिशाली आणि प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज ट्रॅक्टरचा संगम साधत असून त्यामुळे शेतकऱ्यांना एकत्रितपणे उत्पादकता आणि शाश्वतता मिळत आहेत. तंत्रज्ञानाच्या पलीकडे जात शाश्वत विकासासाठी, पर्यावरणपूरक पद्धती स्वीकारण्यासाठी आणि ग्रामीण समुदायांना उन्नत करणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी सोनालिका कटिबद्ध आहे.

या शानदार कामगिरीविषयी प्रतिक्रिया देताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले, फेब्रुवारी २५ मध्ये एकूण १०,४९३ ट्रॅक्टर विक्रीची नोंद झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे..आमच्या प्रगत शेती तंत्रज्ञानामुळे वेगवेगळ्या प्रदेशात आणि उपयोगांत सर्वोत्तमपेक्षाही चांगले उत्पादन मिळत राहून पीक उत्पादन वाढत राहील, याची सोनालिकाने नेहमीच सुनिश्चिती केली आहे. सर्व भागधारकांसाठी समावेशक वाढ हे आमचे मुख्य मूल्य आहे, त्यामुळे नाविन्यपूर्णता आणि अविश्वसनीय वाढीसह शेतकऱ्यांची भरभराट साधणाऱ्या भविष्य घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Trupti Desai

July 15, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026

July 9, 2026