रिव्होल्ट मोटर्सने नव्या RV BLAZEXचे अनावरण केले

  • सशक्त 4KW मोटरसह वेग आणि टॉर्कमध्ये अधिक सुधारणा!
  • मोबाइल कनेक्टिव्हिटी आणि IoT-सक्षम स्मार्ट फीचर्स – जिओ-फेन्सिंग, ओव्हर-द-एअर (OTA) अपडेट्स आणि बरेच काही
  • रिमूव्हेबल बॅटरी – अधिक कार्यक्षमतेसाठी आणि सोयीसाठी काढता येण्याजोगी बॅटरी
  • LED हेडलाइट्स आणि टेललाइट्स – CBS ब्रेकिंग सीस्टमसह उत्तम सुरक्षा
  • 6-इंच LCD क्लस्टर – 4G टेलीमॅटिक्स आणि इनबिल्ट GPS सह
  • बुकिंग आजपासून सुरू; वितरण मार्च 2025 च्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार

भारताच्या इलेक्ट्रिक दुचाकी बाजारातील आपले नेतृत्व अधिक बळकट करत, रिव्होल्ट मोटर्स, भारतातील क्रमांक 1 इलेक्ट्रिक मोटारसायकल ब्रँडने RV BLAZEX ही उच्च-कार्यक्षमता, स्मार्ट आणि किफायतशीर इलेक्ट्रिक मोटारसायकल ₹1,14,990 (एक्स-शोरूम, संपूर्ण भारत) किमतीत लॉन्च केली आहे.

आधुनिक प्रवाशांसाठी खास डिझाइन केलेली RV BLAZEX ही मोटारसायकल 4KW पीक पॉवर मोटर, 150 किमीची विस्तारित रेंज आणि स्मार्ट IoT कनेक्टिव्हिटी यांसह सुसज्ज आहे. हरियाणाच्या मानेसर येथील रिव्होल्टच्या अत्याधुनिक उत्पादन केंद्रात तयार करण्यात आलेली ही नवीन मोटारसायकल भारतातील EV क्रांतीत ब्रँडचे नेतृत्व आणखी मजबूत करते.

लॉन्चप्रसंगी रत्तनइंडिया एंटरप्रायझेस लिमिटेडच्या अध्यक्षा, श्रीमती अंजली रत्तन म्हणाल्या, “रिव्होल्ट मोटर्समध्ये आम्ही नवकल्पना आणि शाश्वततेसाठी वचनबद्ध आहोत. RV BLAZEX ही शहरी आणि ग्रामीण प्रवाशांसाठी किफायतशीर उच्च-कार्यक्षमता असलेली इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्युशन आहे. प्रगत कनेक्टिव्हिटी, उत्कृष्ट रेंज आणि अत्याधुनिक डिझाइनसह, ही लॉन्चिंग सर्वांसाठी शाश्वत गतिशीलता सुलभ करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.”

RV BLAZEX आता स्टर्लिंग सिल्व्हर ब्लॅक आणि इक्लिप्स रेड ब्लॅक या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. ही मोटारसायकल स्टाईल आणि उपयुक्ततेचा परिपूर्ण संगम आहे. फ्रंट स्टोरेज बॉक्स आणि अंडर-सीट चार्जर कंपार्टमेंट यांसारखी वैशिष्ट्ये सोयीसाठी डिझाइन करण्यात आली असून, देखणेपणावर कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही.

RV BLAZEX हा 3.24 kWh लिथियम-आयन बॅटरीने (IP67 रेटेड) सुसज्ज असून, 85 kmph च्या टॉप स्पीडपर्यंत पोहोचतो. यामध्ये तीन रायडिंग मोड्स आणि रिव्हर्स मोड आहेत, जे सहज हाताळणीसाठी मदत करतात. सुरक्षितता आणि आराम सुनिश्चित करण्यासाठी – LED लायटिंग, CBS ब्रेकिंग, टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ट्विन शॉक अॅब्झॉर्बर्स दिले आहेत. 6-इंच LCD डिजिटल क्लस्टरमध्ये 4G टेलीमॅटिक्स, GPS आणि IoT जसे की, मोबाइल कनेक्टिव्हिटी, जिओ-फेन्सिंग व OTA अपडेट्स फिचर्स आहेत.

RV BLAZEX चे खास वैशिष्ट्य म्हणजे, त्याची ड्युअल चार्जिंग क्षमता – फास्ट आणि स्टँडर्ड दोन्ही प्रकारचे चार्जिंग पारंपरिक 3-पिन सॉकेटद्वारे सहज करता येते. फास्ट चार्जिंगद्वारे केवळ 80 मिनिटांत 80% चार्जिंग पूर्ण होते, तर स्टँडर्ड होम चार्जिंगने हेच 3 तास 30 मिनिटांत साध्य होते. बाह्य चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची गरज नसल्याने, प्रत्येक रायडरसाठी हे रीचार्जिंग अधिक सोईस्कर आणि अडथळामुक्त ठरते.

RV BLAZEX ला 3 वर्षांची वॉरंटी (किंवा 45,000 किमी, यापैकी जे आधी येईल) मिळते. देशभरातील वाढत्या डिलरशिप नेटवर्कच्या समर्थनासह, Revolt उत्कृष्ट आफ्टर-सेल्स सेवा प्रदान करते, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहन स्वीकारणे अधिक सुलभ आणि विश्वासार्ह ठरते.

RV BLAZEX ची बुकिंग आजपासून सुरू होत आहे www.revoltmotors.com/book आणि अधिकृत डिलरशिप्सवर उपलब्ध असेल. डिलिव्हरी मार्च 2025 च्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार!