ऊर्जा संचय क्षेत्रातला प्रवेश ठळकपणे दर्शवत PURE तर्फे PuREPower उत्पादने सादर

  • घरगुती, व्यावसायिक आणि ग्रिड अॅप्लिकेशनमध्ये ऊर्जा साठवणूक परिवर्तन करण्यासाठी कंपनीतर्फे घरगुती, व्यावसायिक आणि ग्रिडसाठी PuREPower उत्पादने सादर
  • PURE पुढील 18 महिन्यांत भारतभर 300 हून अधिक डीलर्स आणि वितरकांच्या नेटवर्कद्वारे PuREPower Home आणि Commercial पोहोच विस्तारणार
  • प्रत्येक उत्पादनामध्ये बॅटरी, AI-प्रणीत पॉवर-इलेक्ट्रॉनिक्स, अक्षय ऊर्जेशी सुसंगतता आणि 10 हून अधिक वर्षांच्या जीवनचक्रासाठी झिरो-मेंटेनन्स डिझाइन
  • नॅनो-PCM कूलिंगसह 97% पर्यंत राउंड-ट्रिप कार्यक्षमता
  • 2026 मध्ये सादर होणारे PuREPower Grid भारताच्या ऊर्जा पायाभूत सुविधा स्थिर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ESS उत्पादने (4 MWh पर्यंत) उपलब्ध करणार
  • ही उत्पादने भारताच्या डीकार्बोनायझेशनला पाठबळ देतात, अक्षय ऊर्जा वाढवण्यासाठी आणि मायक्रो ते मॅक्रो स्तरावर महत्त्वपूर्ण ग्रिड स्थिरता सक्षम करण्यासाठी योगदान देतात
  • PuREPower Home साठीची नोंदणी मुंबईत १ एप्रिल २०२५ पासून बुकिंग सुरू होईल. ३० एप्रिल २०२५ पासून अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला सोन्यासह आकर्षक रंगांमध्ये डिलिव्हरी सुरू होईल.

इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि स्वच्छ ऊर्जा नाविन्यपूर्णतेतील अग्रगण्य कंपनी PURE ने आज भारताच्या ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी सुसज्ज PuREPower या क्रांतिकारी ऊर्जा संचय उत्पादनांची घोषणा केली.

PuREPower हे PuREPower Home, PuREPower Commercial, आणि आगामी PuREPower Grid यांच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील ऊर्जा गरजा पूर्ण करते. भारत डीकार्बोनायझेशन आणि अक्षय ऊर्जा उद्दिष्टांच्या दिशेने वाटचाल करत असताना विश्वसनीय, विस्तारीत आणि शाश्वत ऊर्जा संचय उत्पादनांची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने या उत्पादनांची रचना करण्यात आली आहे.

मजबूत डीलर/वितरक नेटवर्कच्या माध्यमातून PURE प्रगत ऊर्जा संचय उत्पादने सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विकसित करत आहे. पुढील 18 महिन्यांत, कंपनी भारतभर 300 हून अधिक टचपॉइंट्स स्थापन करणार असून आपल्या सहयोगीना समग्र तांत्रिक व व्यावसायिक सहाय्य पुरवणार आहे. PuREPower Home ची किंमत 74,999/- रु. (एक्स-फॅक्टरी) पासून सुरू आहे.

सादरीकरणाच्या वेळी बोलताना PURE चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. निशांत डोंगरी यांनी भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणात ऊर्जा संचयाच्या भूमिकेवर भर दिला:
“PuREPower हे केवळ ऊर्जा संचय उत्पादन नाही तर भारताच्या डीकार्बोनायझेशनच्या उद्दिष्टांप्रती असलेली आमची बांधिलकी आहे. अत्याधुनिक बॅटरी तंत्रज्ञान आणि पॉवर-इलेक्ट्रॉनिक्सच्या मदतीने घरे, व्यवसाय आणि ग्रिडला सक्षम करून PURE देशाला कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी सक्षम करत आहे.”

यामध्ये भर घालून PURE चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रोहित वडेरा म्हणाले: “PuREPower सरकारच्या अक्षय ऊर्जा स्वीकार आणि ऊर्जा संचयन एकत्रीकरणाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. घरमालकांना कार्यक्षमतेने सौर ऊर्जा साठवणूक करण्यास सक्षम करण्यापासून ते व्यवसायांना शाश्वत कार्यपद्धतीकडे वाटचाल करण्यास मदत करण्यापर्यंत PuREPower एक अधिक स्मार्ट आणि हरित ऊर्जा परिक्षेत्र निर्माण करत आहे.”

हा विस्तार PuREPower उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार सक्षम करेल आणि स्थानिक उद्योजकतेला चालना देईल.

डिझाइन आणि मेक इन इंडिया या आपल्या बंधीलकीला आणखी बळकट करत PURE बॅटरी तंत्रज्ञान, पॉवर-इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक पॉवर सिस्टम, सोलर कंट्रोल आणि AI यांना एका उत्पादनात एकत्रित करत असल्यामुळे PuREPower द्वारे PURE ऊर्जा संचयन नवोपक्रमात एक नवीन मापदंड प्रस्थापित करत आहे.

भारताची नूतनीकरणीय ऊर्जा क्षमता 2030 पर्यंत 500 GW च्या पुढे जाण्याच्या मार्गावर असताना, PuREPower सारखी ESS उत्पादने ऊर्जा पुरवठा आणि मागणी यांचा समतोल राखण्यासाठी, ग्रिड स्थिर करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अत्यावश्यक आणि महत्वपूर्ण आहेत.

PuREPower Home हे एक अत्याधुनिक ऊर्जा साठवणूक उत्पादन असून आधुनिक घरांच्या वाढत्या ऊर्जा गरजांनुसार तयार करण्यात आले आहे. रूफटॉप सौर ऊर्जेसह विनाअडथळा सामावून घेण्यासाठी डिझाइन केलेले आणि एसी, गीझर, हेवी-ड्युटी किचन अप्लायन्सेस, लिफ्ट यांसारख्या जास्त लोड घेणाऱ्या उत्पादनांना ऊर्जा पुरवून ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देणारे हे उत्पादन आहे.

3KVA, 5KVA आणि 15KVA क्षमतेत उपलब्ध PuREPower Home 24/7 अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करते. आधुनिक आणि आटोपशीर डिझाइन व आकर्षक रंगात उपलब्ध आहे.

देखभाल मुक्त प्रणाली आणि अॅप सक्षम मॉनिटरिंग आणि प्रेडिक्टिव/क्लाउड/AI द्वारे 10 हून अधिक वर्षांचे सुधारित जीवनचक्र यांसह हे भारतीय घरांना वीज बिलात बचत आणि पर्यावरणपूरक हरित भविष्यासाठी योगदान देणारी विश्वासार्ह ऊर्जा उत्पादने पुरवितात.

व्यवसायांना शाश्वततेसोबत कामकाज कार्यक्षमता सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या व्यवसायांसाठी  PuREPower Commercial ऊर्जा संचय उत्पादने 25 KVA ते 100 KVA क्षमतांमध्ये उपलब्ध करून देत आहे. अक्षय ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग करून डिझेल जनरेटरवरील अवलंबित्व कमी करत हे उत्पादन कार्यालये, आरोग्यसेवा सुविधा केंद्रे, टेलिकॉम टॉवर्स आणि रिटेल कॉम्प्लेक्ससाठी उत्तम सेवा देतात.

अॅडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्सने सुसज्ज PuREPower Commercial पीक लोड बॅलन्सिंग सक्षम करतात.

सेंट्रलाईज्ड एसी, एलिव्हेटर्स आणि ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा यासारख्या महत्वपूर्ण यंत्रणांना पाठबळ देतात आणि व्यवसायाच्या वाढत्या गरजांनुसार मॉड्युलर स्केलेबिलिटी पुरवितात.

PuREPower Grid 2026 मध्ये सादर करण्यासाठी सज्ज असून भारताच्या मोठ्या प्रमाणावरील ऊर्जा समस्यांचे निराकरण करण्याच्या दिशेने PURE चे हे एक महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. भारतातील ग्रिड पायाभूत सुविधा सौर आणि पवन ऊर्जेच्या वेगवान विस्ताराशी जुळवून घेत असताना, PuREPower Grid हे ग्रिड स्थिरता, पीक लोड व्यवस्थापन आणि अक्षय ऊर्जा एकत्रीकरण वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

4 MWh पर्यंत क्षमतेसह आटोपशीर कंटेनर-आधारित उत्पादनांत सादर होणारे PuREPower Grid
राज्य वीजवितरण कंपन्या, औद्योगिक ग्राहक, मायक्रो-ग्रिड्स आणि सौर/पवन ऊर्जा पार्क मधील अॅप्लिकेशन साठी डिझाइन करण्यात आले आहे. वारंवारतेचे नियमन (Frequency Regulation) सक्षम करून, विजेच्या वहनातील (Transmission) तूट कमी करून आणि ग्रिड स्थिरता सुनिश्चित करत PuREPower Grid  भारताच्या डीकार्बोनायझेशन उद्दिष्टांना पूरक आहे आणि शाश्वत भविष्यासाठी ऊर्जा पायाभूत सुविधा सुधारत आहे.