ग्लेनमार्कने नवीन एम्पाग्लिफ्लोझिन उपचारांसह मधुमेह पोर्टफोलिओचा केला विस्तार

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने आज भारतात ग्लेम्पा, ग्लेम्पा-एल आणि ग्लेम्पा-एम या ब्रँड नावांनी एम्पाग्लिफ्लोझिन आणि त्याचे फिक्स्ड-ड्रग कॉम्बिनेशन लाँच करण्याची घोषणा केली.

– एम्पाग्लिफ्लोझिनचे ग्लायसेमिक नियंत्रण परिणामकारकरित्या वाढविणे, वजन कमी होण्यास मदत करणे आणि टाइप २ डायबेटिस मेलिटस (टी२डीएम) च्या रुग्णांना कार्डिओव्हॅस्क्युलर-रीनल धोका कमी करणे यांसह अनेक फायदे असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. एम्पॅग्लिफ्लॉझिन हार्ट फेल्युअर (एचएफ) मुळे होणाऱ्या कार्डिओव्हॅस्क्युलर (सीव्ही) मृत्यूंचे किंवा एचएफ साठी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाणही कमी करत असल्याने ते एचएफ च्या रुग्णांना फायदेशीर असल्याचेही दिसून आले आहे.

संशोधनावर भर देणारी जागतिक फार्मास्युटिकल कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लि. ने हे सर्वत्र सुपरिचित असलेले एसजीएलटी२ इन्हिबिटर भारतात दाखल केले आहे. हे औषध ग्लेम्पा (एम्पाग्लिफ्लोझिन १०/२५ एमजी) या ब्रॅण्डनावानिशी व ग्लेम्पा-एल (एम्पाग्लिफ्लोझिन १०/२५ एमजी + लिनाग्लिप्टीन ५ एमजी) आणि ग्लेम्पा-एम (एम्पाग्लिफ्लोझिन १२.५ एमजी + मेटफॉर्मिन ५००/१००० एमजी) या त्याच्या फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन्स (एफडीसीएस) सह बाजारात आणले गेले आहे.

ही औषधे टी२डीएम चे रुग्ण असलेल्या प्रौढ व्यक्तींच्या ग्लायसेमिक नियंत्रणात सुधारणा करण्याच्या व त्याचबरोबर सीव्ही चा धोका असलेल्या टी२डीएम च्या रुग्णांवर होणारे कार्डिओव्हॅस्क्युलर परिणाम कमी करण्याच्या हेतूने तयार करण्यात आली आहेत.

एम्पाग्लिफ्लोझिन हा एचएफ , टी२डीएम आणि कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांचे (सीव्ही)चे निश्चित निदान झालेल्या रुग्णांसाठी जगभरात प्रस्थापित उपचार आहे, ज्याचे कार्डिओव्हॅस्क्युलर आणि किडनीची सुरक्षितता जपण्यासारखे अनेक फायदे आहेत. या औषधामुळे मोठ्या कार्डिओव्हॅस्क्युलर घटनांचे प्रमाण १४ टक्‍क्‍यांनी कमी होत असल्याचे एमपीए -आरईजी क्लिनिकल चाचण्यांमधून दिसून आले असल्याने एम्पाग्लिफ्लोझिन कडे सीव्ही चा उच्च धोका असलेल्या टी२डीएम च्या रुग्णांवरील उपचारांत झालेली लक्षणीय प्रगती म्हणून पाहिले जात आहे.

एम्पाग्लिफ्लोझिन व त्याच्या कॉम्बिनेशन्‍सच्या कार्डिओव्हॅस्क्युलर फायद्यांबरोबर या औषधांच्या परिणामकारकतेलाही अभ्यासातून ठळकपणे अधोरेखित केले गेले आहे. एम्पाग्लिफ्लोझिन (१२.५ एमजी) आणि मेटफॉर्मिन (५००/१००० एमजी) यांचे कॉम्बिनेशन दिवसातून दोनदा घेतल्याने टी२डीएम असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत झाल्याचे (एचबीए१सी द्वारे १.९ टक्के ते २.१ टक्के), वजन कमी झाल्याचे (३-३.८ किग्रॅ) आणि फास्टिंग ब्लड शुगर कमी झाल्याचे (by ४३.२ ते ५०.४ एमजी/ डीएल ) दिसून आले आहे व हे सर्व परिणाम खूपच लक्षणीय असल्याचे २४ आठवड्यांच्या एका अभ्यासपहाणीतून आढळून आले की एका २४ आठवड्यांच्या अभ्यासपहाणीमध्ये एम्पाग्लिफ्लोझिन (१०/२५ एमजी) लिनाग्लिप्टिन (५ एमजी) च्या सोबत घेतल्याने त्यांचे एच बीए१सी खाली आल्याचे (१.२४ टक्‍के), वजन कमी झाल्याचे (२ ते २.७ किग्रॅ) आणि फास्टिंग ब्लड शुगर कमी झाल्याचे (२८.२१ ते २९.५५ एमजी /डीएल) ने आढळून आले आहे व यातून ही दोन्ही औषधे निव्वळ स्वरूपात घेतल्यास जितकी परिणामकारक ठरतील त्याहूनही अधिक परिणामकारक या मिश्र स्वरूपात असल्याचे सिद्ध झाले आहे.

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लि.चे प्रेसिडंट आणि हेड अलोक मलिक म्हणाले, भारतातील कार्डिओमेटॅबॉलिक देखभालीसाठी नाविन्यपूर्ण आणि सहज उपलब्ध उपचार घेऊन येण्याची दृढ परंपरा ग्लेनमार्कला लाभली आहे. ग्लेम्पा श्रेणीच्या बाजारातील पदार्पणामुळे आरोग्यकर्मींना व रुग्णांना प्रस्थापित सिव्हिडी सह टी२डीएम ची स्थिती अधिक परिणामकारकरित्या हाताळण्यास सक्षम बनविणाऱ्या सर्वसमावेशक आणि माफक किंमतीत उपलब्ध असलेल्या उपाययोजना पुरवित आपली ही कटिबद्धता कंपनीने पुन्हा एकदा ठामपणे व्यक्त केली आहे.”

ग्लेम्पा (एम्पाग्लिफ्लोझिन १० एमजी /२५ एमजी ) स्वतंत्रपणे घ्यायचे औषध ग्लायसेमिक नियंत्रणात सुधारणा करणारे व कार्डिओव्हॅस्क्युलर धोका कमी करणारे एसजीएलटी२ इन्हिबिटर म्हणून काम करते. ग्लेम्पा -एल (एम्पाग्लिफ्लोझिन १०/२५ एमजी +लिनाग्लिप्टीन ५ एमजी ) ही एक दुहेरी परिणाम करणारी थेरपी आहे, ज्यात एसजीएलटी२ ला डीपीपी४ इन्हिबिटरची जोड देण्यात आली आहे जेणेकरून कार्डिओ-रीनल धोका असलेल्या टी२डीएम च्या समस्येचे अधिक चांगले व्यवस्थापन करता यावे तर, ग्लेम्पा -एम (एम्पाग्लिफ्लोझिन १२.५ एमजी + मेटफॉर्मिन ५००/१००० एमजी ) मध्ये एसजीएलटी२ इन्हिबिटरचे फायदे व मेटफॉर्मिनची प्रयोगसिद्ध परिणामकारता यांना एकत्र करण्यात आले आहे, ज्यामुळे अधिक प्रभावी ग्लायसेमिक नियंत्रणाची गरज असलेल्या रुग्णांसाठी हा इष्टतम पर्याय ठरत आहे.

कार्डिओव्हॅस्क्युलर आजार आणि डायबेटिसच्या प्रकरणांत वाढ होत असताना भारतभरातील लक्षावधी रुग्णांना उपचारांचे अधिक चांगले परिणाम मिळवून देण्याचे ग्लेनमार्कच्या ग्लेम्पा श्रेणीतील औषधांचे लक्ष्य आहे.