- आपल्या उत्पादन क्षमता वाढाव्या, भारतात असलेल्या कल्पक आणि शाश्वत उपक्रमांना सहाय्य मिळावे म्हणून आत्याधुनिक अशा सुविधेसाठी १,००० कोटी पेक्षा अधिक युरोंची गुंतवणूक
- आवारामध्ये (एडीसी) अप्लिकेशन डिव्हेलप्मेंट सेंटरचा समावेश ज्यामुळे यांत्रिक संशोधन आणि विकास करता येऊ शकेल
डानफ़ॉस पावर सोल्युशन्स, जगातील मोबाईल आणि इंडस्ट्रीयल हायड्रॉलिक्स तसेच इलेक्ट्रिक पावरट्रेन प्रणालीची अग्रगण्य पुरवठेदार कंपनी असून, आज त्यांनी पुण्यातील तळेगाव येथे सात एकर स्थित आपल्या नवीन ग्रीनफ़िल्ड युनिटची सुरवात केली, ज्यामुळे भारतातील त्यांचा विस्तारामध्ये आणखीन एक महत्वाचे पाऊल उचलले गेले आहे. १,००० कोटी युरो पेक्षा अधिक असलेल्या या धोरणात्मक गुंतवणूकीमुळे डानफ़ॉस पावर सोल्युशन्स भारतातील आपल्या उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूकीला अधिक मजबूत बनवत, शाश्वत लक्ष्य साधण्याचा कंपनीचा धोरणाची पुर्तता करेल.
डानफ़ॉस समूहाने स्थिर गतीने आपले उत्पादन संशोधन आणि विकास क्षमता भारतात वाढविल्या असून देशाचा औद्योगिक विकासामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली आहे. डानफ़ॉसचे तळेगाव येथील आवार हे भारतातील सातवे उत्पादन केंद्र असून, यामुळे कंपनीचा स्थानिक गुंतवणूकींचा अंदाज येऊ शकतो. याशिवाय डानफ़ॉसचा उत्पादन सुविधा पुण्यात इतर दोन ठिकाणी, चेन्नई, मुंबई, वडोदरा, बेंगलूरूमध्ये देखील आहेत.
४४ एकर प्लॉटवर, तळेगाव येथील आमचा आवारामध्ये डानफ़ॉस खालील बाबी वाढविणार आहे:
- अस्तित्वात असलेल्या डानफ़ॉस पावर सोल्युशन लाईन्स जसे पंप, मोटर, सिलेंडर आणि वॉल्व ची उत्पादन क्षमता वाढविणे.
- ग्राहकांची वाढती मागणी पूर्णकरण्याकरिता नवीन उत्पादन लाईन सुरू करणे
- टिकाऊ असे उपक्रम आणून, जागतिक डिकार्बनायझेशन ऑपरेशन्स २०३० प्रती डानफ़ॉसची बांधिलकी प्रदर्शित करणे
- एडीसी स्थापित करणे ज्यामुळे स्थानिक ग्राहकांसह एकत्रित अभियांत्रिकी कामे करता येऊ शकतील आणि जलदगतीने संशोधन आणि विकास पुढे नेता येऊ शकेल.
“पुणे येथील आमचा आत्याधुनिक सुविधेमुळे आम्ही आमचा उत्पादन क्षमता सुधारू आणि उत्तम टिकाऊ उपाययोजनांचा माध्यमाने स्थानिक ग्राहकांना अधिक चांगली मदत करू शकू.” असे डानफ़ॉस पावर सोल्युशन्सचे डॅनियल विंटर म्हणाले. “ भारताकडे भक्कम अशा औद्योगिक विकासाची क्षमता आहे आणि आमचा गुंतवणूकीमुळे डानफ़ॉसची क्षमता ही अशा विकासाकरिता नक्कीच सहाय्यक ठरेल. या नवीन सुविधेमुळे स्थानिक, उच्च-गुणवत्ता देणाऱ्या उपाययोजना प्रदानकरून आम्ही ग्राहकांना जलदगतीने वाढत जाणाऱ्या बाजारपेठेमध्ये मदत करण्याची आमची भारतासाठी असलेली बांधिलकी दिर्शवून देऊ.”
भारतातील डानफ़ॉसचा दीर्घकालीन धोरणाचा एक भाग म्हणून , तळेगाव सुविधा ही भारतासह जागतिक बाजरपेठांकरिता आवश्यक असलेल्या विकास आणि उत्पादन क्षमता मजबूत करेल, ज्यामुळे भारतशासनाचा “मेक इन इंडिया” उपक्रमातील एक विश्वसनीय भागीदार म्हणून आपले स्थान मजबूत होईल. या आवाराची नेमकी जागा ही जलद प्रतिक्रिया, सुधारीत पुरवठ्यामधील परिणामकारकता आणि ग्राहकांकरिता सुधारीत सेवांची हमी देते.
“डानफ़ॉसकरिता भारत ही एक महत्वाची विकास बाजारपेठ आहे, आणि आमची तळेगाव येथील गुंतवणूक ही या देशातील वाढत्या उत्पादन प्रणाली प्रती आमची असलेली दीर्घकालीन बांधिलकी आणि त्याकरिता आमची मदतीची असलेली तयारी दर्शविते,” असे डानफ़ॉसचे प्रमुख सस्टेनेबिलिटी अधिकारी आणि ग्लोबल सर्व्हिसेसचे प्रमुख असलेले टोर्बन क्रिस्ट्सेन म्हणाले. “ या सुविधेमुळे आमचे उत्पादनच वाढेल असे नाही तर टिकाऊपणा आणि कल्पकतेप्रती असलेले आमचे लक्ष्य देखील अधिक मजबूतीने अधोरेखांकित केले जाणार आहे.”
डानफ़ॉसइंडिया आपल्या विक्रीचे काम वाढविण्याचा विचारात असताना, औद्योगिक आणि सामाजिकस्तरावर महत्वाचा ठरतील अशा टिकाऊ आणि ग्राहक-केंद्रित उपाययोजना देण्याचा त्यांचा मानस आहे. या विस्तारामुळे डानफ़ॉस भारतातील महत्वाचा उत्पादनकर्ता आणि तांत्रिक बदल घडविणाऱ्यांपैकी एक ठरेल आणि कल्पकता आणि टिकाऊपणामधील एक विश्वसनीय जागतिक भागीदार म्हणून त्याची स्थिती अधिक मजबूत अशी होईल .
डानफ़ॉसचा तळेगाव आवाराचे बांधकाम हे २०२६ चा उत्तरार्धात पूर्ण होईल, व त्यानंतर लगेच कामाला सुरवात होण्याची अपेक्षा आहे.