‘लिवा मिस लिवा २०२४’ ग्रँड फिनाले ही फॅशन, ग्लॅमर, प्रतिभा आणि सशक्तीकरणाची एक अविस्मरणीय रात्र ठरली, ज्यामध्ये सौंदर्य, फॅशन डिझाइन आणि आशय निर्मितीमध्ये भारतातील सर्वांत आशादायी तारकांना प्रदर्शित करण्यात आले. ‘बिर्ला सेल्युलोज’चा १०० टक्के नैसर्गिक मूळ फॅब्रिक ब्रँड असलेला ‘लिवा’ जो त्याच्या अद्वितीय प्रवाहीपणा, कोमलता आणि श्वासोच्छवासासाठी प्रसिद्ध आहे. लिवा सलग पाचव्या वर्षी शीर्षक प्रायोजक म्हणून ‘मिस लिवा’मध्ये अभिमानाने सामील झाला आहे. हे सहयोग विनासायास आहे, कारण दोन्ही ब्रँड स्वतंत्र महिलांना प्रोत्साहन देतात, ज्या मुक्त, उत्स्फूर्त/स्वयंप्रेरित आणि हरहुन्नरी आहेत.
कार्यक्रमात आयुषी मलिकला ‘लिवा मिस लिवा सुपरनॅशनल २०२४’ आणि विप्रा मेहताला ‘लिवा मिस लिवा कॉस्मो २०२४’चा मुकुट देण्यात आला. या अनन्यसाधारण महिला अनुक्रमे ‘मिस सुपरनॅशनल २०२५’ आणि ‘मिस कॉस्मो २०२५’मध्ये जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करतील. तसेच आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धांमध्ये देशाचा गौरवशाली वारसा पुढे नेतील.
रंगीत सायंकाळी एक ऐतिहासिक मैलाचा दगडदेखील चिन्हांकित करण्यात आला, जेव्हा दोन नवीन श्रेणीतील विजेते पहिल्यांदाच घोषित झाले. ओडिशातील सुध्रुती पदियारी हिला ‘लिवा मिस लिवा फॅशन डिझायनर २०२४’ घोषित करण्यात आले, तर बिहारमधील अनन्या प्रवीणने ‘लिवा मिस लिवा कंटेंट क्रिएटर २०२४ ‘चे विजेतेपद पटकावले. त्यांचा विजय हा ‘लिवा मिस लिवा’च्या नवनिर्मितीला अधोरेखित करतो, जो केवळ रॅम्पवरील उत्कृष्टतेप्रमाणेच सर्जनशीलता, कारागिरी आणि सतत विस्तारणाऱ्या फॅशन उद्योगातील डिजिटल प्रभावाचाही उत्सव साजरा करतो.
प्रतिष्ठीत ज्युरी पॅनेलमध्ये उद्योग क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश होता, ज्यात अनुभवी मार्गदर्शक रितिका खटनानी (लिवा मिस लिवा ब्युटी क्वीन २०२४), सोनाक्षी राज (लिवा मिस लिवा फॅशन डिझायनर २०२४) आणि भावना सिंग (लिवा मिस लिवा कंटेंट क्रिएटर २०२४) त्याचबरोबर सेलिब्रेटी डिझायनर मंदिरा विर्क, अभिनेता फरदीन खान, ‘मिस कॉस्मो २०२४’ केतुत पर्माटा ज्युलियास्ट्रिड आणि ‘मिस सुपरनॅशनल २०२३’ अँड्रिया अगुइलेरा आदींचा यात समावेश होता.
‘लिवा मिस लिवा ब्युटी क्वीन २०२४’च्या अंतिम स्पर्धकांनी डिझायनर जोडी जॉन आणि अनंत यांनी बनवलेल्या आकर्षक पोशाखात मंचावर येण्याआधी ‘फो’द्वारे (पीएचओ) दमदार रॅप परफॉर्मन्सने गर्दीत प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण केला. त्यांचा संग्रह, ‘ऑब्सिडियन ड्रीम्स’ ताकद, गूढता आणि परिष्कृत अत्याधुनिकतेचे प्रतीक आहे, ज्यामुळे अंतिम स्पर्धकांना परिचय फेरीसाठी आणि संवादात्मक सत्रासाठी परिपूर्ण पार्श्वभूमी निर्माण झाली. आत्मविश्वास, वक्तृत्व आणि आकर्षणाद्वारे या महिलांनी आधुनिक सौंदर्य – बुद्धिमत्ता, दृढ विश्वास आणि प्रेरणा देण्याची शक्ती यांचे मूर्तिमंत रूप धारण केले.
सायंकाळच्या रमणीयतेत भर घालत, ‘सारेगामा’च्या प्रतिभावान कलाकार प्रगती नागपाल आणि अर्जुन तंवर यांनी त्यांच्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे एक हृदयस्पर्शी संगीत सादरीकरण सादर केले. विजेत्यांच्या घोषणेसह महाअंतिम फेरीची उत्कंठा शिगेला पोहोचली आणि जागतिक मंचावर त्यांच्या परिवर्तनकारी प्रवासाची सुरुवात झाली. सौंदर्य, महत्त्वाकांक्षा आणि अमर्याद शक्यतांचे सार टिपणाऱ्या खास फोटोंनी नयनरम्य कार्यक्रमाची सांगता झाली.