एचएसबीसी इंडिया आणि थ्राईव्ह यांच्या वतीने आयोजन; माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे अध्यक्ष कपिल देव यांची उपस्थिती
एचएसबीसी इंडियाने थ्राईव्हच्या सहकार्याने पुण्यातील नामांकित अशा ऑक्सफर्ड गोल्फ कोर्स येथे तिसऱ्या एचएसबीसी गोल्फ लीगचे शानदार आयोजन केले. माजी भारतीय क्रिकेट कर्णधार आणि प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे विद्यमान अध्यक्ष कपिल देव या दिवसभराच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. थ्राईव्ह आणि एचएसबीसी इंडियाचे नेतृत्व करणारे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. तसेच व्यावसायिक गोल्फपटू रिधिमा दिलावरी यांच्यासह अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती.
ग्रेटर नोएडा, बेंगळुरू, हैदराबाद आणि मुंबई येथे सुरुवातीच्या फेऱ्या यशस्वीपणे पार पडल्यानंतर सन्माननीय प्रादेशिक विजेते एकत्र आले. या मेळाव्याला प्रमुख सीएक्सओ, प्रतिष्ठित नेते आणि उद्योगातील आदरणीय व्यक्तींची उपस्थिती लाभली होती. त्यातून या कार्यक्रमाचे महत्त्वपूर्ण यश अधोरेखित झाले.
प्रमुख पाहुणे कपिल देव यांच्या वतीने टी-ऑफच्या पारंपरिक कार्यक्रमानंतर, अंतिम फेरीत क्रीडाभावना आणि उत्साहाचे उल्लेखनीय प्रदर्शन पाहायला मिळाले. भव्य पुरस्कार समारंभ आणि मनोरंजनाने या लीगचा समारोप झाला. एचएसबीसी गोल्फ लीगच्या तिसऱ्या आवृत्तीतील चार विजेत्यांना सिंगापूरमधील सेंटोसा गोल्फ क्लबमधील तानजोंग कोर्स येथे सर्व खर्चासहित भव्य हेक्सागॉन सूटमध्ये आदरातिथ्यासह सहलीचा अनुभव घेण्याचा मान मिळाला. यातील विजेत्यांना एचएसबीसी महिला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत जगातील आघाडीच्या गोल्फपटूंना स्पर्धा करताना पाहण्याची संधी मिळेल.
एचएसबीसी गोल्फ लीग हे भारतातील सर्वात मोठे हौशी गोल्फिंग प्लॅटफॉर्म आहे. आपल्या हाय नेटवर्थ (एचएनडब्ल्यू) आणि अल्ट्रा-हाय नेटवर्थ (यूएचएनडब्ल्यू) ग्राहकांचा गोल्फिंग अनुभव समृद्ध करण्यासाठी आणि त्याला नव्याने अर्थ देण्यासाठी तसेच खेळाडूवृत्ती आणि उत्कृष्टतेचे प्रदर्शन करणारी भारतातील गोल्फ प्रतिभा एकत्र आणण्यासाठी एचएसबीसीने तयार केलेला तो प्रीमियम प्लॅटफॉर्म आहे.
या भव्य अंतिम फेरीबद्दल बोलताना एचएसबीसी इंडियाचे इंटरनॅशनल वेल्थ अँड पर्सनल बँकिंग प्रमुख संदीप बत्रा म्हणाले, “जगभरातील अधिकाधिक लोकांपर्यंत गोल्फ पोहोचवणे ही एचएसबीसीची जागतिक महत्त्वाकांक्षा आहे. पुढच्या पिढीतील खेळाडूंपर्यंत हा खेळ पोहोचवण्यास आणि बाजारपेठांमध्ये या खेळाची उभारणी करण्यास मदत करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत.
हा कार्यक्रम उत्कृष्टता आणि क्रीडावृत्तीबद्दल आमच्या कटिबद्धतेचा पुरावा आहे. या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाने केवळ भारतातील सर्वोत्तम हौशी गोल्फपटूंनाच एकत्र आणले नाही तर आमच्या आदरणीय ग्राहकांना त्यांच्या आवडत्या खेळात सहभागी होण्यासाठी एक व्यासपीठही प्रदान केले आहे. प्रतिभेचा असा भव्य उत्सव आयोजित करणे ही एचएसबीसी इंडियातील आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. भारतात गोल्फच्या वाढीला चालना देत राहण्याची आम्हाला अपेक्षा आहे.”
तिसऱ्या गोल्फ लीगच्या भव्य यशाबद्दल बोलताना थ्राईव्हचे संस्थापक आणि सीईओ ध्रुव वर्मा म्हणाले, “दरवर्षी आम्हाला अधिकाधिक सहभाग दिसून येत आहे आणि हे वर्षही काही वेगळे नाही. अधिक आकर्षण आणि सदस्यांच्या लाभांचा समावेश करता यावा यासाठी एचएसबीसी इंडियाच्या साथीने एक मालमत्ता/आयपी म्हणून या गोल्फ लीगची उभारणी करत राहू. थ्राईव्हमध्ये आम्ही एआयचा वापर करून संपूर्ण मॉडेलची आणखी उभारणी करण्यासही उत्सुक आहोत.”
जागतिक पातळीवर लॉयल्टी प्रोग्राम आणि लाभ पुरविणारी वन-स्टॉप तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म असलेल्या थ्राईव्हच्या सहकार्याने आयोजित एचएसबीसी गोल्फ लीगची तिसरी आवृत्ती जागतिक दर्जाच्या खेळाप्रती दीर्घकालीन कटिबद्धतेचा भाग आहे.
या कार्यक्रमाचे इव्हेंट अपडेट्स एचएसबीसी गोल्फ लीग मोबाईल अॅपवर उपलब्ध आहेत. एचएसबीसीचे ग्राहक आणि गोल्फप्रेमी आगामी कार्यक्रमांचा मागोवा घेऊ शकतात, स्पर्धांसाठी नोंदणी करू शकतात, रिअल टाइममध्ये स्कोअर अपडेट पाहू शकतात, कामगिरीचा मागोवा घेऊ शकतात आणि सहकारी गोल्फर्सशी कनेक्ट होऊ शकतात. त्यामुळे अर्थपूर्ण नेटवर्किंग संधी उपलब्ध होतील. हा प्लॅटफॉर्म गोल्फ कोर्समध्ये मोफत प्रवेश, अॅक्सेसरीज आणि खाद्य व पेये यावर सवलत, मोफत गोल्फ कार्ट बुकिंग आणि पाहुण्यांसाठी विशेषाधिकार असे विशेष लाभही पुरवतो.