छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन ‘हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी कृतिशील होऊया ! – श्री. पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती
केंजळ, ता.भोर येथे भगवेमय वातावरणात हिंदु राष्ट्र जागृती सभा संपन्न !
भोर (जिल्हा पुणे) – आज भारतात बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढत आहे. समाजात प्रतिदिन कुठे ना कुठे महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहे. महाकुंभमेळा येथे जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक केली जाते या घटनांवरुन हिंदूंच्या सणांवर होणारी आक्रमणे अजूनही चालू आहेत हे लक्षात येते. वक्फ बोर्डच्या माध्यमांतून लँड जिहाद करून हिंदूंच्या जमिनी बळकावणे चालूच आहे. हिंदु धर्मावरील अशा विविध आघातांवर मात करून धर्मरक्षण करायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना हीच काळाची आवश्यकता आहे असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी केले. केंजळ, तालुका भोर, पुणे येथे 8 मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या वेळी 325 हुन अधिक ग्रामस्थ सभेला उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. भोंगवली येथील श्री दत्तगड देवस्थानचे मुख्य व्यवस्थापक ह.भ.प. बाळासाहेब जाधव महाराज यांचीही सभेला वंदनीय उपस्थिती लाभली. ह.भ.प. बाळासाहेब जाधव महाराज यांचा सत्कार हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश पाठक यांच्या हस्ते करण्यात आला.
