ईव्हीचा वापर वाढवण्यासाठी टाटा.ईव्ही प्रयत्नशील

इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील अग्रणी आणि भारतातील EV क्रांतीचे पुरस्कर्ते TATA.ev इलेक्ट्रिक मोबिलिटीविषयीचे गैरसमज दूर करण्यात देखील आघाडीवर आहेत आणि हे गैरसमज दूर होऊन या वाहनांचा जास्तत जास्त अंगिकार व्हावा आणि अधिकाधिक लोकांसाठी तो भविष्यासाठी सज्ज असलेला पर्याय बनावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

EVs विषयीचा एक मोठा गैरसमज हा आहे की, त्यांची रेंज मर्यादित असते. Nexon.ev 45 आणि Curvv.ev या आपल्या उत्पादनांद्वारे TATA.ev ने या चिंतेचे निवारण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि 489 – 502 km (P1+P2) आणि 350-425 किमी C75* ची प्रभावी ARAI-प्रमाणित रेंज सादर केली आहे. ही दोन्ही मॉडेल्स जलद चार्जिंगला समर्थन देतात, जी 40 मिनिटांत 10-80% चार्ज होतात. Curvv.ev हे मॉडेल तर 70 kW+ चार्जरचा उपयोग करून 15 मिनिटांत 150 किमी पर्यंत रेंज वाढवते. कंपनीला ग्राहकांच्या वर्तनात देखील एक बदल दिसत आहे – 2024 मध्ये 47% ग्राहकांनी दररोज 75 किमी. पेक्षा जास्त ड्रायव्हिंग केले. 2020 मध्ये हे प्रमाण फक्त 13% होते. यावरून ह्या सर्वसामान्य समजाला छेद मिळाला की, EVs फक्त शहरातल्या शहरात प्रवास करण्यासाठीच उपयुक्त आहेत.

आणखी एक समज हा आहे की EVs त्यांच्या समकक्ष ICE वाहनांपेक्षा खूपच महाग असतात. परंतु, TATA.ev ने लोकलाईझेशन आणि तांत्रिक प्रगतीचा उपयोग करून हे अंतर यशस्वीरित्या मिटवले आहे आणि Curvv.ev आणि Nexon.ev या गाड्या बाजारातल्या आघाडीच्या ICE वाहनांच्या समकक्ष किंमतीत सादर केल्या आहेत. उलट, ICE वाहनांपेक्षा अधिक फीचर्स या मॉडेल्समध्ये आहेत. अशाप्रकारे, इलेक्ट्रिक मोबिलिटी जास्तत जास्त लोकांसाठी सहजप्राप्य बनवण्याचा प्रयत्न TATA.ev ने केला आहे. किफायतशीर असण्याबरोबरच, EVs मूलतःच ऑटोमॅटिक आहेत आणि कमी आवाज करणाऱ्या असून अधिक दमदार आहेत, उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या आहेत आणि त्यांच्या देखरेखीचा खर्च देखील कमी आहे. याचे कारण हे आहे की, पारंपरिक IC पॉवरट्रेन्सच्या तुलनेत त्यांच्यात हालचाल करणारे भाग संख्येत कमी आहेत. पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत EV चा ग्राहक पाच वर्षात 4.2 लाख रु. ^^ पेक्षा जास्त पैसे वाचवू शकतो. त्यामुळे इलेक्ट्रिक मोबिलिटीचा मूल्य प्रस्ताव देखील मजबूत आहे.

TATA.ev EV सेगमेन्टमध्ये निरंतर नवीन सुरक्षा मानके स्थापित करत आहे. Punch.ev, Nexon.ev आणि Curvv.ev या सर्व वाहनांना BNCAP कडून आकर्षक 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. सहा एअरबॅग, IP67-रेटेड वॉटरप्रूफ व डस्ट-प्रूफ मोटर्स आणि प्रगत लेव्हल-2 ADAS टेक्नॉलॉजी यांसारख्या फीचर्ससह ही सर्व वाहने चालक आणि प्रवासी यांच्या सुरक्षेला प्राधान्य देतात.

जागरूकता वाढवण्यासाठी, समुदायांपर्यंत पोहोच वाढवण्यासाठी आणि TATA.ev खरेदी व सर्व्हिसिंगसाठी एक समर्पित वन-स्टॉप उपाय प्रदान करण्यासाठी कंपनीने देशभरात सहा EV-एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स आणि तीन समर्पित सर्व्हिस सेंटर्स लॉन्च केली आहेत.
पोहोच वाढवून, EVs चा अवलंब करण्यातील अडथळे दूर करून आणि ग्राहकाच्या मनातील सामान्य गैरसमज दूर करून EVs ना मुख्य प्रवाहात आणण्याबाबत TATA.ev वचनबद्ध आहे. कारण ग्राहक प्रोफाइल प्रारंभिक अंगिकार करणाऱ्यांपासून ते प्रारंभिक बहुमतापर्यंत विकसित होत आहे.