खास पुणेरी ट्विस्ट असलेल्या या पात्रासह श्री. अनिल कपूर आरोग्यसेवेशी संबंधित संवाद साधणार
महाराष्ट्रातील रुग्णालयांची सर्वात मोठी शृंखला असलेल्या सह्याद्रि हॉस्पिटलने नव्या मोहिमेचा प्रारंभ केला आहे. ‘सह्याद्रि फॉर लाइफ’ असे या मोहिमेचे नाव आहे. राज्यभरातील आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्याच्या हेतूने व सह्याद्रि रुग्णालय समूहाला ‘सह्याद्रि २.०’ च्या दिशेने वाटचाल करण्यासाठी या महत्त्वकांक्षी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते श्री. अनिल कपूर यांनी मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे. श्री. अनिल कपूर यांच्या सहकार्याने आता ही मोहिम आरोग्यसेवा व्यवसायातील ब्रॅण्ड-सेलिब्रिटी भागीदारीचा नवा मापदंड प्रस्थापित करणारी ठरेल, असा विश्वास रुग्णालयाच्यावतीने व्यक्त करण्यात आला.
श्री. अनिल कपूर आणि व्ही.के. (V.K.) या काल्पनिक पात्रातील संवाद हे या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य असेल. व्ही.के. या पात्राचे पूर्ण नाव ‘विचार कर’ असे आहे. हे पात्र सामान्य मराठी माणसाच्या विचारांचे प्रतिनिधीत्व करते. व्ही. के. विनोदी तर आहेच पण बुद्धिवान आणि विचारवादीही आहे. हे पात्र टिपिकल मराठी माणसाच्या स्वभावगुणांचे दर्शन घडवते. या मोहिमेत एके – व्हीके (AK-VK) ही डिजीटल मालिका प्रसारित केली जाईल. या मालितेक श्री. अनिल कपूर व्ही.के.शी आरोग्यविषयक चर्चा करताना दिसतील. या चर्चेत गंभीर आणि अतिशय गुंतागुंतीचे वाटणारे विषय साध्या, आकर्षक आणि प्रभावीपणे चर्चिले जातील. ही आरोग्यविषयक चर्चा सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून प्रभावीपद्धतीने मांडली जाईल.
या मोहिमेला सर्व माध्यमांवर व्यापक प्रसिद्धी जाईल. प्रिंट, रेडिओ, ओटीटी प्लेटफॉर्म, डिजीटल चॅनल्स आदी माध्यमांवर या मोहिमेचा प्रचार केला जाईल. ही मोहिम सह्याद्रि रुग्णालयांच्या राज्यभरातील आरोग्यसेवा उंचावण्याच्या कृतीची वचनबद्धता दर्शवते हा संदेश या मोहिमेच्या प्रचारातून दिला जाईल. रुग्णांशी संपर्क साधणे, रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञांच्या देखरेखीत उपचार देणे, रुग्ण प्रथम हे रुणालयाचे प्रमुख उद्दिष्ट या मोहिमेच्या माध्यमातून सर्वांसमोर सादर केले जाईल.
‘सह्याद्रि फॉर लाइफ’ या मोहिमेबद्दल बोलताना सह्याद्रि हॉस्पिटल्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अब्रारअली दलाल यांनी सांगितले की, ‘‘सह्याद्रि हॉस्पिटल्स लोकांना उत्तम आरोग्यवान आणि तंदरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. ‘सह्याद्रि फॉर लाइफ’ या मोहिमेच्या माध्यमातून आम्हांला राज्यभरातील रुग्णांच्या आरोग्याचे खंबीर साथीदार म्हणून काम करायचे आहे. रुग्णांच्या आजारपणातील प्रत्येक टप्प्यावर आम्ही त्यांना साथ देऊ, रुग्णांना उपचारातून पूर्णपणे बरे करण्यासाठी त्यांना सर्वोत्तम उपचार दिले जातील. या मोहिमेला श्री. अनिल कपूर यांनी पाठिंबा दिल्याने आम्ही ख-या अर्थाने उत्सुक आहोत.’’
सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख श्री. मनिष राय यांनीही या मोहिमेबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘ या मोहिमेला बॉलिवूड आयकॉन श्री. अनिल कपूर यांनी सहकार्य केल्याने आम्हांला वेगवेगळ्या प्रेक्षकांशी जोडून घेणे शक्य होणार आहे. श्री. अनिल कपूर यांनी फिटनेस आणि निरोगी आरोग्याला कायमच महत्त्व दिले आहे. सह्याद्रि हॉस्पिटल्सने हीच भावना आपल्या रुग्णांविषयी जपली आहे. आम्हां दोघांचेही समान विचार आहेत. या मोहिमेतील ही भागीदारी जास्त महत्त्वाची ठरते. ही मोहिम म्हणजे सर्वांची निरोगी, चैतन्यपूर्ण जीवनाच्या दिशेने वाटचाल व्हावी म्हणून हाती घेतलेली एक चळवळ आहे.
मोहिमेत श्री. अनिल कपूर यांचा सहभाग निश्चितच प्रेरणादायी आणि सर्वांवर प्रभावशाली ठरेल. लोकांशी सहजरित्या रमरस होणारे व्हीके (VK) पात्र रंगवण्यात आले आहे. या पात्रातून तुम्हांला आरोग्य सेवेतीत तत्परता, वचनबद्धता आणि नावीन्यपूर्णतेचाही परिचय होईल. व्हीके आणि श्री. अनिल कपूर यांच्या संवादातून सर्वसामान्यांना समजेल अशी उपयुक्त माहिती दिली जाईल. या मोहिमेतून आम्हांला केवळ आमचा प्रचार करायचा नसून आरोग्यसेवा क्षेत्रात रुग्णांचा विश्वास कमावणे, जनजागृती करणे तसेच सक्रिय कार्यक्रम राबवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.’’
या मोहिमेतून ‘तुम्ही आणि आम्ही’ (You & Us) हा महत्त्वाचा संदेशही दिला जाईल. आरोग्य तसेच स्वतःचे हित जपणे हे खरे तर दोघांची समान जबाबदारी आहे, असा संदेश मोहिमेच्या मदतीने दिला जात आहे. म्हणजे तुमचे आरोग्य जपण्याची जबाबदारी एकाची नव्हे तर दोघांची आहे. म्हणून ‘तुम्ही आणि आम्ही’ या संदेशाचा प्रचार केला जाईल. सह्याद्रि रुग्णालयातील जगप्रसिद्ध डॉक्टर्स, सर्जन्स तसेच जागतिक मानांकनाच्या वैद्यकीय तंत्रज्ञनाच्या मदतीने प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा मथितार्थ या संदेशातून दिला जात आहे. हा संदेश प्रत्येकाने स्वतःची योग्य काळजी घेण्याचे आवाहन करतो. प्रत्येक रुग्ण निरोगी राहील याकरिता सह्याद्रि रुग्णालयाची टीम सर्वोत्कृष्ट रुग्णसेवा पुरवेल.