वापी येथील मेरिल अकॅडमी रोबोटिक इनोव्हेशन समिट (आरआयएस) ने रोबोटिक- असिस्टेड शल्य चिकित्सा क्षेत्रात सहकार्य, संशोधन आणि नवनिर्माण करण्यासाठी भारतातील आणि जगभरातील विख्यात शल्यचिकित्सक एका व्यासपीठावर आणले. या कार्यक्रमात मिसो ला प्रदर्शित करून, मेरिलने आपल्या अविष्कारी एआय ने समृद्ध असलेल्या जॉईंट रिप्लेसमेंट रोबोटिक सिस्टीम आणि त्यांच्या शल्यचिकित्सा विषयातील अचूक कौशल्य आणि भारतातील रुग्णांचे समाधान या गोष्टी व्यासपीठावर आणल्या.
मिसो द्वारे जॉईन रिप्लेसमेंट शल्यचिकित्सा क्षेत्रात क्रांती
संपूर्ण समिटच्या केंद्रस्थानी मिसो होते, जे जून २०२४ मध्ये सादर करण्यात आले आणि अत्यंत कमी वेळात ते भारतातील ५० ठिकाणी स्थापित करण्यात आले. मिसो ला एआय आधारित उन्नत प्रकारची क्षमता आहे ज्यामध्ये वर्तमान वेळेतील विश्लेषण आणि अचूक अलाइनमेंट चा समावेश आहे; या सर्व कौशल्यांचे सर्व उपस्थित त्यांना सादरीकरण करण्यात आले आणि सखोल माहिती देण्यात आली. जॉईंट रिप्लेसमेंट शल्यचिकित्सेमध्ये नवीन तंत्रज्ञानाने कशाप्रकारे क्रांती आणली आहे हे उपस्थित त्यांना सादर केले.
मिसो सोबत, मेरिलचे आर अँड डी विभागातील सर्व विकासात्मक प्रकल्प समिट दरम्यान सादर करण्यात आले, ज्यामध्ये उन्नत प्रकारच्या युनी-नी रिप्लेसमेंट, टोटल हीप रिप्लेसमेंट, ट्रॉमा, आणि स्पाईन शल्यचिकित्सा या प्रकारातील प्रकल्प सादर करण्यात आले. हे प्रकल्प सादर करीत असताना, अत्यंत कठीण अशा आव्हानात्मक शल्यचिकित्स्येच्या गरजेसाठी, मेरिलचे सातत्यपूर्ण संशोधन आणि शल्यचिकित्सेसाठी रोबोटिक समाधान आणणे व त्याचा विस्तार करण्यासाठी लक्ष केंद्रित करणे याचा प्रत्यय सर्वांना आला.
पुणे येथील साईश्री हॉस्पिटल चे रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. नीरज आडकर म्हणाले की मेरिलचे संशोधन आणि ज्ञान विषयक प्रतिबद्धता प्रेरणादायी आहे. मिसो ही फक्त रोबोटिक यंत्रणा नाही तर जॉईंट रिप्लेसमेंट शल्यचिकित्सेमध्ये एक क्रांतिकारी बदल घडवणारी यंत्रणा आहे जे या शस्त्रक्रियेमध्ये लागणारे कौशल्य आणि उपचारांचा दर्जा वाढवते
भविष्यकाळाची गुंतवणूक
मेरिलचा आरोग्य विभागातील प्रवास हा त्यांच्या ४ लाख स्क्वेअर-फुट वरील प्रचंड मोठ्या सुविधेने सुसज्ज आहे. मेरिल मध्ये कार्डिओ व्हॅस्क्युलर, ऑर्थोपेडिक्स, रोबोटिक्स, निदान, कार्डियाक सर्जरी, इंडो सर्जरी, पेरिफेरल इंटरव्हेंशन, ईएनटी, संशोधन आणि विकास, प्रशिक्षण यासाठी सुसज्ज अशी सुविधा आहे. ही बांधकाम सुविधा मेरिलच्या उन्नत अशा मेड-टेक संशोधनासाठी आणि तंत्रज्ञान व शिक्षणाचा वापर करून रुग्णांची काळजी घेण्याच्या बाबीवर आपले लक्ष केंद्रित करते.
भारतातील आरोग्य क्षेत्रातील त्रुटी कमी करणे
मिसो सारखी सुविधा फक्त भारतातील मेट्रो शहरांपुरती मर्यादित न राहता अशा प्रकारचे सुविधा भारतातील सर्व लहान व मोठ्या शहरांमध्ये पोहोचायला हवी यासाठी मेरिल अविरतपणे प्रयत्न करत आहे. या अभियाना अंतर्गत कंपनीने अनेक रुग्णालयांसोबत भागीदारी केली आहे, यासह शल्यचिकेचा त्यांना प्रशिक्षण देणे, आणि त्यांना रोबोटिक सर्जरी सहजपणे उपलब्ध करून देणे हे ध्येय कंपनीने ठरविले आहे.
मेरिल चे मुख्य मार्केटिंग अधिकारी मनिष देशमुख म्हणाले की, मेरिल ला आरोग्यासाठी संशोधन करणे यासाठी नेहमीच अग्रेसर राहणे आवडते. मिसो हे फक्त तंत्रज्ञानाला अधोरेखित करत नाहीत तर ते तंत्रज्ञानासह भारतातील शल्यचिकित्सा विकासासाठी आपली प्रतिबद्धता दर्शवते. रोबोटिक इनोव्हेशन समिट हे आमच्या सहकारी वातावरण तयार करणे, शल्यचिकित्सक आणि रुग्णांना लाभ व्हावा अशी भविष्यकालीन इकोसिस्टीम तयार करणे या आमच्या ध्येयाशी सुसंगत आहे,