पुणेकरांसाठी खुशखबर! जीबीएस बाधित रुग्णांची संख्या झाली कमी..

गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकर जीबीएस या नवीन आलेल्या आजारामुळे त्रस्त झालेली होती. पुणे महानगरपालिका वादात सापडलेली असताना विविध ठिकाणी जीबीएस बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. पुणेकर अक्षरशः वैतागलेले होते. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच आता पुणेकरांसाठी नवीन खुशखबर आहे. आज शहरात एकही जीबीएस बाधित रुग्णांची नोंद झालेली नाही.

गेल्या दोन ते तीन आठवड्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णांची संख्या यामुळे प्रशासन व पालिका यांच्या डोकेदुखीत चांगलीच वाढ झाली होती परंतु आज कोणत्याही रुग्णाची नोंद न झाल्यामुळे पुणे महानगरपालिका देखील निवांत श्वास घेत आहे.

पुण्यात आतापर्यंत जीबीएस बाधित रुग्णांची संख्या 118 होती. हे सारे रुग्ण जरी संशयित असले तरी त्यांच्यावर महानगरपालिकेत उपचार चालू होते. उपचार चालू असताना 5 जणांचा मृत्यू झाला होता परंतु 90 गुणांची जीबीएस चाचणीचे अहवाल आले होते त्यापैकी 30 रुग्ण पुणे महानगरपालिका तर 88 रुग्ण हे नव्याने पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या गावांमधील आहेत. आतापर्यंत जीबीएसच्या 31 रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात आलेले आहे, त्यापैकी 28 रुग्ण हे आयसीयू मध्ये आणि 16 रुग्ण व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, महानगरपालिकेच्या टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व टँकरच्या पाण्यात ई-कोलाय आणि क्वालिफोर्मचे विषाणू आढळून आले त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी टँकर भरला जातो,अशा ठिकाणी दूषित पुरवठा असल्याकारणाने टँकरमध्ये हे विषाणू आले असे देखील अहवालात कळाले. म्हणूनच येणाऱ्या काही दिवसात पुणेकरांना पाणी उकळून पिण्याचा सल्ला देखील देण्यात येत आहे. त्याचबरोबर दूषित पाण्याचा वापर करू नये. शारीरिक स्वच्छता ठेवण्याचे आवाहन देखील पुणे महानगरपालिका प्रशासन द्वारे करण्यात येत आहे.