पुणे प्रहार डेस्क – जर महाराष्ट्रातील महिलांनी भाजप शिंदे यांचे महायुती सरकार जिंकून दिल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करेल असे वचन मंत्र्यांनी दिले होते. या वचनाची पूर्तता देखील महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी केली आणि त्याची प्रचिती म्हणून सध्या महाराष्ट्र सरकारला माहितीचे सरकार लाभले आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्यास पंधराशे रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जात आहे.
गेल्या सात महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ देखील घेत आहे. 2024 ते जानेवारी 25 पर्यंत अनेक महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहे आणि म्हणूनच आता फेब्रुवारी महिन्याच्या कोणत्या तारखेला पैसे जमा होतील याची उत्सुकता देखील महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लागलेली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना वादाच्या भोवऱ्यात देखील सापडलेली आहेत. ही योजना बंद होईल अशी चर्चा देखील रंगली परंतु ही योजना बंद होणार नाही याची खुद्द माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली होती तसेच भविष्यात या योजने संदर्भातील अनेक महत्त्वांच्या तरतुदीवर विचार देखील केला जाईल असे आश्वासन मंत्री अदिती यांनी दिले होते.
या लाडक्या बहिणी योजनेमुळे अनेक निराधार महिलांना आधार मिळाला. अनेकांची दिवाळी सुखाची झाली. दर महिन्याला आर्थिक सहाय्य मिळत असल्यामुळे महिला देखील आनंदी आहेत त्याचबरोबर ही रक्कम महिलांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी उपयोगी ठरत आहे असे देखील केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणामध्ये कळून आले. त्याचबरोबर भविष्यात देखील प्रत्येक हप्ता वेळेवर मिळावा अशी आशा देखील लाडक्या बहिणींनी व्यक्त केली.
या मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 20 फेब्रुवारीपर्यंत लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असे देखील म्हटले जात आहे परंतु अद्याप महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही विभागाद्वारे अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तरीही हा हप्ता वीस तारखेला हस्तांतरित होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. आतापर्यंत या योजनेचे आधीचे हप्ते वेळेवर जमा झाल्यामुळे लवकरच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील खात्यामध्ये जमा होईल असा विश्वास महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या योजनेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ शकता.