डीबीएस फाऊंडेशनने फंडिंगमध्‍ये एसजीडी ५.१ दशलक्षांसह आर्थिक साक्षरता उपक्रम विकसित करण्‍यासाठी हकदर्शकसोबत केली हातमिळवणी

  • सुधारितडीबीएसउपक्रमहकदर्शकसोबतच्‍यासुरूवातीच्‍याउद्देश-केंद्रितसहयोगावरआधारितआहे
  • भारतातील५०,०००सूक्ष्‍मउद्योजकांसह५००,०००लाभार्थींसाठीआर्थिकस्थिरताआणिसामाजिकसुरक्षिततेमध्‍येसुधारणाकरण्‍याचामनसुबा

डीबीएस फाऊंडेशनने हकदर्शक एम्‍पॉवरमेंट सोल्‍यूशन्‍स प्रा. लि. (एचईएसपीएल) सोबत सहयोगाने नवीन उपक्रमाची घोषणा केली आहे, जो ग्रामीण भारतावर फोकस करण्‍यासोबत आर्थिक समावेशन प्रगत करण्‍यास मदत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.

हा उपक्रम २०२३ मध्‍ये घोषणा करण्‍यात आलेल्‍या डीबीएस बँकेच्‍या मोठ्या कटिबद्धतेचा भाग आहे, जेथे कमी उत्‍पन्‍न असलेल्‍या व वंचित व्‍यक्‍तींचे जीवन आणि उदरनिर्वाहामध्‍ये सुधारणा करण्‍याकरिता पुढील दशकामध्‍ये एसजीडी १ बिलियनचे वाटप करण्‍यात येईल. डीबीएस फाऊंडेशन या उपक्रमाला निधीसाह्य करण्‍यासाठी एसजीडी ५.१ दशलक्ष देईल. या उपक्रमाचे देशभरातील एकूण ५००,००० लाभार्थींच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याचे लक्ष्‍य आहे.

भारतातील ग्रामीण भागांमधील व्‍यक्‍तींना अनेकदा आर्थिक सेवा व सामाजिक कल्याण हक्‍कांबद्दल माहिती आणि उपलब्‍धतेचा अभाव यांसारख्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. डीबीएस-निधीसाह्य उपक्रम अशा व्‍यक्‍तींना आर्थिक संकल्पना आणि उत्पादने समजून घेण्यास मदत करण्यासाठी संसाधने देत, तसेच हकदर्शकच्या एजंट टीमद्वारे समर्थित सामाजिक कल्याण योजनांचा लाभ कसा घ्‍यावा यासाठी साधने आणि सहाय्य प्रदान करत या मोठ्या तफावतींना दूर करतो. हा उपक्रम तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांमधील ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करेल.

या उपक्रमाचा भाग म्‍हणून, हकदर्शकच्या महिला एजंट्ससह समर्पित फील्ड टीम्सना डिजिटल आणि आर्थिक साक्षरता प्रशिक्षण सत्रे व पात्रता तपासणी सत्रे आयोजित करण्यासाठी तैनात केले जाईल. या उपक्रमात पात्र लाभार्थ्यांना, विशेषतः महिला, वृद्ध आणि रस्त्यावरील विक्रेते आणि व्यापारी यांसारख्या सूक्ष्‍म उद्योजकांना योग्य सामाजिक कल्याण योजनांमध्ये नोंदणी करण्यास प्राधान्य दिले जाईल. याव्यतिरिक्‍त, आर्थिक फसवणुकीपासून संरक्षण प्रबळ करण्यासाठी सहभागींना घोटाळा-विरोधी जागरूकता प्रशिक्षण दिले जाईल.

या सेवांची परिणामकारकता वाढवण्‍यासाठी हकदर्शक योजना कार्ड हे क्‍यूआर कोडेड कार्ड लाभार्थ्यांच्या सामाजिक हक्‍क प्रोफाइलमध्ये ऑनलाइन सहज प्रवेश प्रदान करेल आणि योजनेच्या पात्रतेबद्दल वेळोवेळी माहिती देईल. डीबीएस कर्मचारी त्यांची कर्मचारी स्वयंसेवक चळवळ ‘पीपल ऑफ पर्पज’अंतर्गत या उपक्रमामध्‍ये सक्रियपणे सहभागी होतील, जेथे कन्‍टेन्‍टबाबत जागरूकता वाढेल आणि हकदर्शक टीमसोबत सामुदायिक सत्रे आयोजित केली जातील.

डीबीएस बँक इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक आणि ग्रुप स्‍ट्रॅटेजिक मार्केटिंग अँड कम्‍युनिकेशन्‍सचे प्रमुख अझमत हबिबुल्‍ला म्‍हणले, “दशकापूर्वी स्‍थापनेपासून डीबीएस फाऊंडेशनने व्‍यक्‍तींचे जीवन व उदरनिर्वाहामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे आणि हकदर्शकसोबत नवीन उपक्रम लाँच करताना आनंद होत आहे. आम्‍ही हकदर्शकला २०१८ पसून बिझनेस फॉर इम्‍पॅक्‍ट म्‍हणून निपुण केले आहे. भारतात तीन दशकांपासून कार्यरत असण्‍यासह डीबीएस बँक आपल्‍या उद्देश-केंद्रित दृष्टिकोनाशी बांधील राहण्‍याप्रती आणि परिवर्तनाला चालना देण्‍याप्रती अधिक कटिबद्ध आहे.

हकदर्शकसोबत सहयोगाने आम्‍ही संयुक्‍त मिशनला बँकिंगपलीकडे घेऊन जाऊ आणि आर्थिक समावेशनाच्‍या माध्‍यमातून समुदायांचे सक्षमीकरण करू. लक्ष्‍य सोल्‍यूशन्‍ससह वास्‍तविक माहितीमधील तफावतींना दूर करत आम्‍ही दारिद्र्यतेमधून मार्ग काढण्‍यामध्‍ये आणि भावी  पिढ्यांसाठी सर्वोत्तम विश्‍व घडवण्‍याकरिता दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्‍यामध्‍ये यशस्‍वी होऊ.”

वर्षानुवर्षे हकदर्शक डीबीएस फाऊंडेशनसोबत (डीबीएसएफ) संलग्‍न आहे, तसेच २०१८ डीबीएसएफ बिझनेस फॉर इम्‍पॅक्‍ट ग्रॅण्‍ट आणि २०२० डीबीएसएफ बिझनेस ट्रान्‍सफॉर्मेशन इम्‍प्रूव्‍हमेंट ग्रॅण्‍टच्‍या माध्‍यमातून डीबीएस फाऊंडेशन हकदर्शकला पाठिंबा देत आहे. २०२३ मध्‍ये, हकदर्शक आंध्रप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, तामिळनाडू व तेलंगणा येथील वंचित समुदायांमधील नागरिकांमध्‍ये डिजिटल आणि आर्थिक साक्षमतेला चालना देण्‍यासाठी भारतातील डीबीएसएफ उपक्रम सहयोगी बनली.

या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून २ लाखांहून अधिक लाभार्थींसाठी १०,००० हून अधिक डिजिटल व आर्थिक साक्षरता सत्रे यशस्‍वीरित्‍या आयोजित करण्‍यात आली, तसेच ४ लाखांहून अधिक व्‍यक्‍तींना हक्‍क तपासणी व सुविधा सपोर्ट देण्‍यात आला, ज्‍यामुळे ते संबंधित कल्‍याण योजनांचा लाभ घेऊ शकले. उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे डिजिटल व आर्थिक साक्षरतेमध्‍ये प्रशिक्षित जवळपास ९० टक्‍के सहभागी महिला होत्‍या.

या घोषणेबाबत मत व्‍यक्‍त करत हकदर्शकचे सहसंस्‍थापक मुख्‍य कार्यकारी अधिकारी अनिकेत देवगर म्‍हणाले, “आम्‍ही झपाट्याने बदलत असलेल्‍या विश्‍वामधून नेव्हिगेट करत असताना अधिक मदतीची गरज असलेल्यांना पाठिंबा देणे आणि कोणीही वंचित राहणार नाही याची खात्री घेणे महत्त्वाचे आहे. आमच्‍या नवीन उपक्रमाचा वंचित समुदायांना औपचारिक यंत्रणेच्‍या फायद्यांचा लाभ घेण्‍यासाठी कौशल्‍ये व आत्‍मविश्‍वास देत त्‍यांच्‍यामध्‍ये दीर्घकालीन आर्थिक स्थिरता आणि स्‍वावलंबीत्वाला चालना देण्‍याचा मनसुबा आहे.

डीबीएस फाऊंडेशन आमच्‍या प्रवासामध्‍ये विश्‍वसनीय सहयोगी राहिली आहे आणि वर्षानुवर्षे त्‍यांच्‍या सातत्‍यपूर्ण पाठिंब्‍याने आम्‍हाला आमची पोहोच वाढवण्‍यास, तसेच अधिकाधिक व्‍यक्‍तींच्‍या जीवनात सकारात्‍मक प्रभाव निर्माण करण्‍यास सक्षम केले आहे. आम्‍ही पुन्‍हा एकदा अत्‍यंत उद्देशपूर्ण उपक्रमासाठी त्‍यांच्‍यासोबत सहयोग करण्‍यास उत्‍सुक आहोत, ज्‍यामुळे सहयसोगात्‍मक कृतीला चालना मिळत खरा प्रभाव घडून येईल.”

हा उपक्रम वंचित समुदायांना पाठिंबा देण्‍यासह आशियामधील आर्थिक स्थिरतेची माहिती मिळण्‍यास सक्षम करण्‍याच्‍या डीबीएस फाऊंडेशनच्‍या व्‍यापक उद्दीष्‍टाचा भाग आहे, तसेच समाजातील वंचित व वृद्ध व्‍यक्‍तींवर मुख्यत्वे लक्ष आहे. बिझनेसेस फॉर इम्‍पॅक्‍टला प्राधान्‍य देत डीबीएस उद्योगांना नफा व उद्देश या दुहेरी मनसुब्‍यासह साह्य करते, तसेच आपल्‍या मिशनशी संलग्‍न राहत त्‍यांना निपुण करते आणि डीबीएसची संस्‍कृती व कार्यसंचालनांमध्‍ये सामावून घेते.