उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या समोर युवकाकडून आत्मदहनाचा प्रयत्न, युवकाला झाली अटक..

By: Editor_Pratik

On: Thursday, January 30, 2025 8:03 AM

आत्मदहना
Google News
Follow Us

पुणे प्रहार डेस्क – 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक घटना समोर आलेली आहे. भोर पुरंदर उपविभाग पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर एका युवकाने आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे, यामुळे सुरक्षा यंत्रणा तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये खळवजनक वातावरण निर्माण झालेले आहे. 26 जानेवारी च्या दिवशी सगळीकडे प्रजासत्ताक दिवस थाटामाटात साजरा करत असतानाच या घटनेमुळे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला.

अंकुश उमाजी वाघापुरे आत्मदहन करणाऱ्या युवकाचे नाव आहे. या घटने प्रकरणी दत्तात्रय शांताराम खेंगरे पोलीस हवालदार यांनी या तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे.

आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे सासवड पोलीस स्टेशनमध्ये या युवका विरोधात अनेक कलम अंतर्गत दत्तात्रय शांताराम खेंगरे यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. सासवड या ठिकाणी नऊ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या समोर मोकळ्या जागेत या युवकाने विषारी औषध प्राशन करून स्वतःचा तसेच इतरांचा देखील जीव धोक्यात घातलेला आहे, असे कृत्य केल्याने मानवी जीवित हानी होईल असे कृत्य करण्याचा प्रयत्न या तरुणांनी केला आहे आणि म्हणूनच आजूबाजूच्या व्यक्तींना भयभीत करण्याचा प्रयत्न करणे तसेच शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण करणे अशा विविध गुणांच्या कलमांच्या अंतर्गत या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे.

एकंदरीत या युवकाने आत्महत्या करण्यामागे नेमकी काय कारण आहे याचा तपास देखील पोलीस अधिकारी करत आहे. या घटने संदर्भातील पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सूर्यकांत गायकवाड करत आहेत. घडलेल्या प्रकार हा दुर्दैवी असला तरी आत्मदहन करणे, हे चुकीचे आहे आणि म्हणूनच भविष्यात असे कृत्य होऊ नये याकरिता या युवकाविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Deshseva Foundation

September 3, 2026

Deshseva Foundation

September 3, 2026

September 2, 2026

September 1, 2026

August 27, 2026

August 25, 2026