चोरांनी राहत्या घराचे कुलूप तोडून लंपास केली साडेसात लाखापेक्षा जास्त रोकड, पुण्यात चोरांचा सुळसुळाट

By: Editor_Pratik

On: Thursday, January 30, 2025 8:09 AM

चोर
Google News
Follow Us

पुणे प्रहार डेस्क – पुणे शहरामध्ये चोरी – गुंडागर्दी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. त्यात हिवाळ्याचे दिवस असल्याकारणाने अनेकदा घरातील सदस्य गाढ झोपेत असताना चोरांना चोरी करण्यासाठी मोकळे वातावरण मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत, त्यातच भर म्हणून पुणे शहरातील कोंढवा भागात नुकतीच चोरी घडलेली आहेत. या चोरी प्रकरणी चोराने घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम सोन्याचे दागिने इत्यादी चोरलेल्या आहेत.

एकंदरीत सात लाखापेक्षा जास्त किंमतीचे ऐवज पळवल्याची घटना पुणे शहरामध्ये घडलेली आहे. ही घटना कोंडव्यातील हेवन पार्क सोसायटीत घडली. या घटना प्रकरणी कोंढवा पोलीस चौकीत तक्रार देखील नोंदवण्यात आलेली आहे त्याचबरोबर तक्रारीनुसार चोट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार , ही घटना पुणे शहरातील कोंढवा येथे हेवन पार्क सोसायटीत घडली.

तक्रारदार या सोसायटीत गेल्या अनेक दिवसांपासून राहायला आहेत. 24 जानेवारी रोजी तक्रारदार व त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी फिरायला गेले होते आणि याच वेळेत 25 जानेवारी रोजी त्यांच्या राहत्या घरी चोरांनी कुलूप तोडून घरातील ऐवज चोरला. एकंदरीत सात लाखापेक्षा जास्त किंमतीचा ऐवज चोरांनी चोरलेला आहे. घरी परतल्यानंतर चोरी झाल्याची घटना त्यांच्या निदर्शनास आली.

घडलेली घटना भयंकर असून पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत त्याचबरोबर लवकरच चोराचा तपास घेतला जाईल अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांनी दिली आहे. घडलेल्या या घटनेमुळे सोसायटीत भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे त्याचबरोबर सोसायटीत सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आलेले आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

September 24, 2026

September 23, 2026

September 22, 2026

September 20, 2026

September 15, 2026

September 12, 2026