‘क्राफ्टन, इंडिया ’ने ‘डेव्हसिस्टर्स’च्या सहकार्याने ‘कुकीरन इंडिया’ हा नवा कॅज्युअल रनर मोबाइल गेम आता अँड्रॉइड आणि आयओएस मोबाइलवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे, असे जाहीर केले आहे.
खास करून भारतीय दर्शकांसाठी निर्माण केलेल्या या गेममधील पात्रे सर्वांना आवडणाऱ्या गुलाबजाम आणि काजू कतली कुकीजसारख्या मिठायांपासून प्रेरणा घेऊन तयार केली आहेत. गेमला स्थानिक तडका देण्यासाठी टायनी तबला आणि पॅरट दादासारखे वैशिष्ट्यपूर्ण पाळीव प्राणीही त्यात आहेत. यांसह भारताचा नकाशा आणि गेमअंतर्गतच भारतीय कार्यक्रमांचा समावेश आहे. गेममधील खेळाडू ‘कुकी’ पात्राची निवड करतात आणि उडी मारून व अडथळ्याखालून घसरगुंडी करून पॉइंट्स मिळवतात. त्यामुळेच हा गेम अत्यंत मजेदार आणि गुंतवून टाकणारा अनुभव देतो.
मित्रांना आणि कुटुंबीयांना आनंद मिळेल अशा तऱ्हेने या गेमची रचना केलेली असून मौज कायम ठेवण्यासाठी त्यात लीडरबोर्डसह अन्य सामाजिक वैशिष्ट्यांचा अंतर्भाव केला आहे. सादरीकरणाच्या केंद्रस्थानी थोर कुस्तीपटू ‘दि ग्रेट खली’ ही डिजिटल फिल्म ठेवण्यात आली आहे. या फिल्ममध्ये एका मजेदार वळणावर आता आपण धावणार आहोत, अशी घोषणा करून खली सगळ्यांना धक्का देतो.
या अनपेक्षित वृत्ताने लोक उत्तेजित होऊन आरडाओरडा करत प्रतिक्रिया देतात. आपण ‘कुकीरन इंडिया’मध्ये धावणार असल्याचे जाहीर करून या गोंधळातला खिलाडूपणा आणखी वाढतो. या सोप्या गेममध्ये, रोमांचक आव्हानांनी आणि आनंद देणाऱ्या अनुभवांमुळे गेमची रंगत वाढत जाते. मोबाइल गेमचे रंगतदार आकर्षण आणि खलीची वास्तवापेक्षाही अधिक रोमांचक प्रतिमा यांच्या काल्पनिक मिलाफामुळे गेमचे सादरीकरण खरेचच अविस्मरणीय झाले आहे. ही जादू आणखी रम्य करण्यासाठी ‘ओह कुकी रन रन रन’ हे आकर्षक जिंगलही वाजत राहाते. त्यामुळे प्रत्येक प्रसंग उर्जादायी बनतो आणि फिल्म संपल्यावरही दर्शकांच्या मनात कथा रेंगाळत राहते.
क्राफ्टन इंडियाचे पब्लिशिंग प्रमुख मिनू ली यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘डेव्हसिस्टर्सच्या सहकार्याने आम्ही कुकीरन इंडिया प्रत्यक्षात आणला आहे. त्याला मिळालेल्या अतुलनीय प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. या गेममध्ये मौज आणि भारतीय घटकांचा अचूक मिलाफ झाला आहे. हा गेम भारतीय खेळाडूंसाठी खास तयार केला असून त्यांच्या लाडक्या मालिकेसाठी त्यांना एक नवा अनुभव देत आहे.’
ली यांनी पुढे सांगितले, की ‘क्राफ्टन इंडियासाठी २०२४ हे वर्ष उल्लेखनीय ठरले. २०२५ मध्ये देशात आणखी तीन-चार गेम सादर करून ही गती कायम ठेवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. धोरणात्मक गुंतवणूक आणि स्थानिक गुणवत्तेचा पुरस्कार यांच्यासह आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून भारताच्या गेमिंग उद्योगाचा चेहरामोहराच बदलून टाकण्याची आणि प्रगतीशील, सर्वसमावेशक गेमिंग परिसंस्था निर्माण करण्याची आमची दृष्टी प्रतिबिंबित होते.’
‘कुकीरन इंडिया’च्या साह्याने भारतीय दर्शकांसाठी सहजसुलभ मौज आणि स्थानिक घटकांचे अनोखे मिश्रण करून कॅज्युअल गेमिंग क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून टाकण्यास ‘क्राफ्टन’ सज्ज झाली आहे.