अझीम प्रेमजी विद्यापीठाचे २०२५-२६ साठी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू

By: Editor_Pratik

On: Wednesday, December 4, 2024 1:35 PM

अझीम प्रेमजी Azim Premji
Google News
Follow Us

अझीम प्रेमजी विद्यापीठाने त्यांच्या बेंगळुरू क्षेत्रात पदव्युत्तर पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमामध्ये ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एज्युकेशन-अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन’ (बालपणीचे शिक्षण), इन्क्ल्युझिव्ह एज्युकेशन (सर्वसमावेशक शिक्षण), टिचिंग चिल्ड्रेन विथ लर्निंग डिसॲबिलीटीज (शिकण्यास सक्षम नसलेल्या मुलांना शिकवणे) आदींचा समावेश आहे. अर्ज करण्यास अखेरचा दिवस १२ जानेवारी २०२५ आहे

एक वर्षाच्या अर्धवेळ अभ्यासक्रमात लेखी आणि सराव ( थेअरी अँड प्रॅक्टिस) पद्धतीचे संतूलित मिश्रण आहे. ऑनलाइन आणि कॅम्पसमध्ये परस्परसंवादासह एकत्रित अभ्यासक्रमाचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. नियमित शालेय शिक्षण प्रणालीमध्ये कार्यरत शिक्षक आणि समकक्षांच्या क्षमता विकसित करण्यात मदत करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या विकसित अभ्यासक्रमाची गरज पूर्ण करणे हा यामागील उद्देश असल्याचे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले.

पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रम शिक्षण क्षेत्रातील कार्यरत अनुभविकांसाठी डिझाइन केलेला आहे. शिक्षक, शिक्षक-शिक्षाविशारद, विशेष शिक्षक, शाळेचे पदाधिकारी आदी किमान दोन वर्षांच्या कामाच्या अनुभवासह सरकारी/खासगी/ सामाजिक संस्थांबरोबर (एनजीओ) काम करणाऱ्या व्यक्ती या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात.

‘अझीम प्रेमजी विद्यापीठातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ मध्ये कल्पना केल्याप्रमाणे समानतेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. हा अभ्यासक्रम शिक्षक आणि शिक्षाविशारदांना बालपणीचे शिक्षण, सर्वसमावेशक शिक्षण, विशेष मुलांना शिकवणे यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात ज्ञान, कौशल्ये आणि दृष्टीकोन प्रदान करतात.

पदव्युत्तर अभ्यासक्रम अशा प्रकारे डिझाइन केला आहे जे सराव करणाऱ्या शिक्षकांना त्यांचे विद्यार्थी आणि सहकाऱ्यांबरोबर दैनंदिन संवाद साधण्यास लागू होईल, आणि सरावात गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यास याद्वारे सक्षम केले जाईल, असे अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ एज्युकेशनचे संचालक अंकुर मदान म्हणाले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026