झेप्टोची १० मिनिटांत प्रीमियम कार केअर उत्पादने पोहोचविण्यासाठी पार्क प्लस शी केली भागीदारी

संपूर्ण भारतात ८ पेक्षा अधिक ठिकाणी ११ पार्क प्लस कार केअर उत्पादने झेप्टोवर उपलब्ध होणार

त्वरित डिलीव्हरीसाठी ख्यातनाम असलेल्या भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या ग्राहक इंटरनेट ब्रँड झेप्टोने सर्व कार केअर उत्पादनांसाठी हक्काची जागा असलेल्या पार्क प्लस शी हातमिळवणी केली आहे. या अंतर्गत संपूर्ण भारतात आठपेक्षा अधिक ठिकाणी ११ पार्क प्लस कार केअर उत्पादने झेप्टोवर उपलब्ध होणार आहेत. या पहिल्याच प्रकारच्या उपक्रमामुळे क्लिनिंग किट्स, कम्फर्ट अॅक्सेसरीज आणि मेंटेनन्स अवजारांसारख्या उच्च दर्जाच्या उत्पादनांच्या शोधात असलेल्या कारमालकांसाठी नवे अनुभव खुले होणार आहेत.

भारतीय रस्त्यावर ५ कोटींपेक्षा अधिक खासगी कार धावत आहेत, त्यामुळे उंची (प्रीमियम) कार केअर उत्पादनांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्वरेने होणाऱ्या ई-कॉमर्समुळे भारतीय कार मालकांना अशा उत्पादनांसाठी अधिक सुलभता आणि डिलीव्हरीची अपेक्षा असते. झेप्टो आणि पार्क प्लस हे सुलभ आणि किफायती अशी कार केअर उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी हातात हात घालून काम करत आहेत.

पार्क प्लस च्या कार केअर उत्पादनांच्या श्रेणीत खालील बाबींचा समावेश आहे :
● २०० रुपयांपेक्षा कमी : कार शाम्पू, ग्लास क्लीनर, स्क्रॅच रिमूव्हर, डस्टबिन
● ५०० रुपयांपेक्षा कमी : ट्रॅव्हेल नेक पिलो, हँगिंग टिश्यू बॉक्स, मायक्रोफायबर कापड
● १००० रुपयांपेक्षा कमी : कार क्लिनिंग कीट, 3-इन-1 कूशन,
● २००० रुपयांपेक्षा कमी : लाँग बॅक रेस्ट, टेल बोन कूशन

या भागीदारीविषयी बोलताना पार्क प्लस चे संस्थापक आणि सीईओ श्री. अमित लखोटिया म्हणाले, “पार्क प्लस मध्ये नाविन्यपूर्ण आणि ग्राहकानुकूल उत्पादने उपलब्ध करून देऊन कार मालकीचा अनुभव अधिक सोपे करणे हे आमचे ध्येय आहे. झेप्टोसोबत भागीदारी करणे हे आमच्यासाठी एक मोठे पुढचे पाऊल आहे, त्यामुळे निवडक १५ प्रीमियम कार केअर उत्पादने अधिक व्यापक लोकांपर्यंत नेणे आम्हाला शक्य होणार आहे.

कारमालकांना आता उच्च दर्जाची कार केअर उत्पादने शोधण्यासाठी अनेक दुकानांत जाण्याची किंवा धडपड करण्याची गरज नाही. वाहनांच्या देखभालीसाठी लागणारी प्रत्येक वस्तू आता त्यांना एकाच ठिकाणी मिळू शकेल, ती त्यांना त्यांच्या उंबरठ्यावरच मिळेल. पुढील ३ महिन्यांत झेप्टोवरील आमची कार केअर उत्पादने १५० पेक्षा अधिक करण्याचे आमचे लक्ष्य आहे.”

झेप्टोचे मुख्य चीफ अधिकारी चंदन मेंडिरट्टा म्हणाले, पार्क प्लस ची उच्च दर्जाची कार केअर उत्पादने थेट ग्राहकांच्या उंबरठ्यापर्यंत आणण्यासाठी सहयोग करताना आम्हाला आनंद होत आहे. वेग आणि सुविधा ही झेप्टोच्या केंद्रस्थानी असून या भागीदारीमुळे आम्हाला कार देखभालीच्या अत्यावश्यक वस्तूंचा समावेश करून आमच्या उत्पादनांची मालिका विस्तार करता येईल. हे शक्य केल्याबद्दल आम्ही आमच्या विक्रेत्यांचे आभार मानतो. या प्लॅटफॉर्मवर पार्क प्लस उत्पादने उपलब्ध झाल्यामुळे वापरकर्त्यांना आता या वस्तू वेगाने आणि विश्वासाने सहजपणे मिळू शकतील, ज्यासाठी झेप्टोची ओळख आहे. त्यामुळे त्यांचा एकूण खरेदीचा अनुभव समृद्ध होतो.”

झेप्टो वर पार्क प्लस उत्पादनांची पडलेली भर ही अतुलनीय सोयी आणि वेगासह निवडक दैनंदिन जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याच्या कंपनीचे समर्पण अधोरेखित होते.झेप्टोच्या सेवा क्षेत्रातील कार मालक आता प्रीमियम कार केअर वस्तू सहजपणे मिळवू शकतील व त्या त्यांच्या दारापर्यंत त्वरेने आणि विना कटकट वितरित केल्या जातील.