---Advertisement---

वी ने स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष ऑफर्सची घोषणा केली; प्रीपेड ग्राहकांना अतिरिक्त डेटा आणि ओटीटी लाभ मिळणार 

By: Editor_Manas

On: Friday, August 16, 2024 2:52 PM

Google News
Follow Us
---Advertisement---

भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी वीने आपल्या प्रीपेड ग्राहकांना अतिरिक्त डेटा आणि ओटीटी लाभांसह मर्यादित कालावधीच्या ऑफर्सची घोषणा केली आहे. १३ ते २८ ऑगस्ट २०२४ पर्यंत या ऑफर्सचा लाभ घेता येईल. अर्धवार्षिक किंवा वार्षिक पॅकसह रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना यामध्ये विशेष लाभ मिळतील.

दैनंदिन मर्यादेच्या व्यतिरिक्त ३० जीबी ते ५० जीबी मोफत हाय-स्पीड डेटा हे वी च्या स्वातंत्र्यदिन ऑफरचे खास वैशिष्ट्य आहे. अर्धवार्षिक पॅकसाठी हा अतिरिक्त डेटा ४५ दिवस वैध राहील तर वार्षिक पॅकसोबत अतिरिक्त डेटाचा लाभ ९० दिवस घेता येईल. पॅकचा भाग म्हणून दिल्या जाणाऱ्या दैनंदिन डेटा कोटाच्या व्यतिरिक्त हा अतिरिक्त डेटा दिला जात आहे. २८ ऑगस्ट २०२४ पर्यंत या ऑफर लागू राहतील.

याखेरीज वी ने आपल्या वार्षिक पॅकमध्ये डिस्ने+ हॉटस्टार आणि ऍमेझॉन प्राईम व्हिडीओ यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सची एक वर्षाची सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट केली आहे. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

वी ऍपमार्फत रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना वार्षिक रिचार्ज पॅक किमतीवर अतिरिक्त सूट मिळवता येईल. ३४९९, ३६९९ आणि ३७९९ रुपयांच्या रिचार्जसाठी युजर्सना अनुक्रमे ५०, ७५ आणि १०० रुपयांची सूट मिळवता येईल.

ऑफर्सची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:

रिचार्ज वैधता डेटा लाभ व्हॉईस लाभ ओटीटी लाभ अतिरिक्त डेटा
१७४९ १८० दिवस दर दिवशी १.५ जीबी अनलिमिटेड –   – ४५ दिवसांसाठी ३० जीबी अतिरिक्त डेटा
३४४९ (ही किंमत फक्त वी ऍपवर उपलब्ध आहे) ३६५ दिवस दर दिवशी १.५ जीबी अनलिमिटेड –   – ९० दिवसांसाठी ५० जीबी अतिरिक्त डेटा
३६२४ (फक्त ही किंमत फक्त वी ऍपवर उपलब्ध आहे) ३६५ दिवस दर दिवशी २ जीबी अनलिमिटेड १ वर्षाची डिस्ने+ हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन
३६९९ (ही किंमत फक्त वी ऍपवर उपलब्ध आहे) ३६५ दिवस दर दिवशी २ जीबी अनलिमिटेड १ वर्षाची ऍमेझॉन प्राईम मोबाईल सबस्क्रिप्शन

 

याशिवाय वी शॉपमध्ये लोकप्रिय ब्रँड्सची गिफ्ट कार्ड्स मिळवता येतील. ३० पेक्षा जास्त ब्रँड व्हाऊचर्सवर अतिरिक्त सूट देखील मिळेल, यामध्ये झोमॅटो फूड ऑर्डर्सवर ४% सूट, पीवीआर मुव्ही तिकिटांवर १०% सूट, पॅन्टलून्समधील खरेदीवर १२% सूट इत्यादींचा समावेश आहे. फक्त वी ऍपमध्ये उपलब्ध.

For Feedback - feedback@example.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 9, 2026

March 9, 2026

March 9, 2026

March 9, 2026

March 9, 2026

March 9, 2026